दिल्लीत पोलिसांवर हल्ला केल्याचा जुना व्हिडिओ मुंबईतील घटना म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Missing Context Social

सोशल मीडियावर दोन ट्राफिक पोलिसांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही घटना मुंबईतील असून पोलिसांना दंड लावला म्हणून मुस्लिम समुदयातील लोकांनी असे मारले.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ मुंबईतील नसून 9 वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या घटनेचा आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुकीच्या संदर्भाने हा व्हिडिओ पसरविला जात आहे. 

काय आहे दावा ? 

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “आज मुंबईत @ पोलिसांनी चालान जारी केले तेव्हा मुस्लिमांनी त्यांना मारहाण केली.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 9 वर्षांपूर्वीचा आहे.

एनडीटीव्हीने हाच व्हिडिओ 14 जुलै 2015 रोजी युट्यूब चॅनलवर शेअर केला होता. 

व्हिडिओसोबत माहिती दिली होती की, “ईशान्य दिल्लीतील गोकुळपुरी येथे ट्राफिक पोलिसांनी ट्रिपल सिट व हेल्मेट न घातल्याबद्दल दंड भरण्यास सांगितले. यानंतर दुचाकीस्वार आणि त्याच्या दोन साथीदारांनी पोलिसांवर हल्ला केला.”

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, या घटनेनंतर अरोपींची ओळख पटल्यावर पोलिसांना त्यांना अटक केले.

पोलिसांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली की, जखमी झालेले दोन्ही ट्राफिक पोलिस मनोज आणि जय भगवान यांना गुरु तेग बहादूर रुग्णालयात पाठवण्यात आले.

तसेच आरोपी शानवाज, त्याचा भाऊ आणि वडील सगीर अहमद यांना अटक करण्यात आले.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ 9 वर्षांपूर्वीचा आहे. 2015 मध्ये ईशान्य दिल्लीचा गोकुळपुरी परिसरात दोन ट्राफिक पोलिसांवर हल्ला करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली होती.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:दिल्लीत पोलिसांवर हल्ला केल्याचा जुना व्हिडिओ मुंबईतील घटना म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate  

Result: Missing Context