
महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असून पाणी साचलेल्या विमानतळाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, जलमय झालेल्या विमानतळाचा हा व्हिडिओ मुंबईचा आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ मुंबईचा नसून 2023 साली जलमय झालेल्या चेन्नई विमानतळाचा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये विमानतळावर साचलेले पाणी आणि काही कर्मचारी रेनकोट घालून विमानाची तपासणी करताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मुंबईत ढगफुटी, मुंबई विमानतळावरील दृश्य.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ मुंबई विमानतळाचा नाही.
‘टाईम्स नाऊ’ने 4 डिसेंबर 2023 रोजी हाच व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता.
मूळ पोस्ट – ट्विटर
पुढे अधिक माहितीसाठी सर्च केल्यावर कळाले की, डिसेंबर 2023 मध्ये मिचोंग चक्रीवादळामुळे चेन्नई विमानतळाच्या धावपट्टीवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अधिक महिती येथे वाचू शकता.
पुढे व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला एक पिवळी पाटी दिसते. ज्यावर 12°59’05.9″N 80°09’47.7″E असे लिहिलेले आहे. हे कोड अक्षांश आणि रेखांश भौगोलिक निर्देशांकांवर आधारित असतात.
सदरील माहितीच्या आधारे हे कोऑर्डिनेट्स गुगल मॅपवर सर्च केल्यावर कळाले की, हे चेन्नईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
मूळ पोस्ट – गुगल मॅप
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ मुंबई विमानतळाचा नाही. मुळात हे दृष्य 2023 मधल्या चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आहेत. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
Title:2023 मध्ये जलमय झालेल्या चेन्नई विमानतळाचा व्हिडिओ मुंबईचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: Misleading


