पश्चिम बंगालमध्ये जमावाद्वारे पोलिसांवर दगडफेक केल्याचा जुना व्हिडिओ सध्याचा म्हणून व्हायरल

दिशाभूल करणाऱ्या I Misleading

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जमावाद्वारे सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दावा केला जात आहे की, पश्चिम बंगालमध्ये जामावाने सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून 5 वर्षांपूर्वीचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये जमाव सुरक्षा रक्षकांवर हल्ला करताना आणि दगडफेक दिसतो.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितो की, “पश्चिम बंगाल मध्ये सुरक्षा रक्षकांना स्वतःलाच सुरक्षेची गरज.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 5 वर्षांपूर्वीचा आहे.

इंडियन एक्सप्रेसने 29 एप्रिल 2020 रोजी हाच व्हिडिओ आपल्या ट्विटर आकाउंटवर शेअर केला होता.

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

काय आहे संपूर्ण घटना ?

पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील टिकियापारा या भागात अनेक जण लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या पार्श्वभूमीवर 29 एप्रिल 2020 रोजी या भागात पोलिस कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करत होते. नाग्रिकांना घरात परत जाण्यास सांगितल्यावर जमावाने पोलिसांवर हल्ला आणि दगडफेक केली. यामध्ये दोन अधिकारी जखमी झाले.

या घटनेनंतर पोलिसांवर हल्ला करणाऱ्या किमान 10 अरोपींना अटक करण्यात आली होती. अधिक महिती येथे वाचू शकता.

मूळ पोस्ट – मुंबई मिरर | आर्काइव्ह

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून 5 वर्षांपूर्वीचा आहे. 2020 मध्ये पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केली होती. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पश्चिम बंगालमध्ये जमावाद्वारे पोलिसांवर दगडफेक केल्याचा जुना व्हिडिओ सध्याचा म्हणून व्हायरल

Written By: Sagar Rawate  

Result: Misleading