
काश्मीरमध्ये पहलगाममधील बैसरन व्हॅलीत 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरू लागले. अशाच एका व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने 12 पाकिस्तानी सैनिकांना ठार करीत त्यांच्या 3 चौक्या व 2 तोफा नष्ट केल्या.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 5 वर्षांपूर्वीचा आहे. जुना व्हिडिओ चुकीच्या माहितीसह शेअर केला जात आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये तोफगोळा मारताना दिसते. युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “टाटा पाणी सेक्टरमध्ये भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरात किमान 12 पाकिस्तानी सैनिक ठार, 3 चौक्या आणि 2 तोफा नष्ट जोरदार तोफखाना आणि तोफगोळ्यांचा मारा सुरू.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 5 वर्षांपूर्वीचा आहे.
इंडियन आर्मी – भारतीय रक्षक नामक फेसबुक पेजने हाच व्हिडिओ 1 मे 2020 रोजी शेअर केला होता. तसेच आयएएफ गरुड नामक फेसबुक फॅन पेजनेदेखील हाच व्हिडिओ 15 एप्रिल 2020 रोजी शेअर केला होता.
अधिक सर्च केल्यावर कळाले की, रिपब्लिक भारतने आपल्या युट्यूब चॅनलवर हाच व्हिडिओ 14 जून 2020 रोजी शेअर केला होता.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “पूंछमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे (सीजफायर) उल्लंघन, लष्कर योग्य उत्तर देत आहे.”
दैनिक भास्करच्या बातमीनुसार 2020 मध्ये पाकिस्तानकडून 14 जूनपासून सीजफायरच उल्लंघन सातत्याने वाढत होते. पाकिस्तानने कोणतीही चिथावणी न देता युद्धबंदीचे उल्लंघन करत पूंछ जिल्ह्यातील बालाकोट सेक्टर आणि राजौरीतील कृष्णा घाटी सेक्टर व नौशेरा सेक्टर आणि आसपासच्या गावांना लक्ष केले. तेव्हा भारतीय सैनिकांनी प्रत्युत्तर देत तोफगोळांचा मारा केला होता. संपूर्ण बातमी येथे व येथे वाचू शकता.
खालील तिन्ही व्हिडिओचे स्क्रिनशॉट पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि पाच वर्षांपूर्वी फेसबुक पेज व रिपब्लिक भारतने शेअर केलेली क्लिप एकच आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ 5 वर्षांपूर्वीचा असून नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्याशी संबंधित नाही. 2020 मध्ये पाकिस्ताने जम्मू आणि काश्मीरमधील सीमा भागात सीजफायरचे उल्लंघन केल्याने भारतीय सैन्याने तोफगोळांचा मारा केला होता.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:तोफगोळा हल्ल्याचा 5 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ पहलगाममधील घटनेशी जोडून व्हायरल
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Misleading
