मुंबईतील मराठा मोर्चाची विक्रमी गर्दी म्हणून बैलगाडा शर्यतीचा जुना व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईमध्ये आंदोलन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर अलोट गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, या व्हिडिओमधील गर्दी मराठा मुंबई मोर्चासाठी जमलेली आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ मराठा आरक्षण किंवा सध्याच्या मुंबई मोर्चाशी संबंधित नाही.

काय आहे दावा ? 

व्हायरल व्हिडिओमध्ये एका मैदानात अलोट गर्दी दिसते. सोबत लिहिले आहे की, “2 कोटी मराठे मुंबईत रेकॉर्ड ब्रेक.”

मूळ पोस्ट – फेसबुक | इंस्टाग्राम | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हाच व्हिडिओ जून महिन्यापासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. म्हणजेच 29 ऑगस्टपासून सुरू झालेल्या मुंबई मराठा मोर्चाच्या दोन महिन्याआधीचा आहे.

एका इंस्टाग्राम पेजने 22 जून रोजी पोस्ट करून हा व्हिडिओ पेडगाव येथील हिंदकेसरी मैदानावरचा  असल्याचे म्हटले आहे.

https://www.instagram.com/reel/DLNb1AzNeen/?utm_source=ig_web_copy_link

अधिक सर्च केल्यावर निलेश जाधव नामक युजरने 22 जून रोजी हिंदकेसरी पेडगाव मैदानावरील बैलगाडा शर्यतीचा एक व्लॉग इंस्टाग्राम आणि यूट्युबवर शेअर केल्याचे आढळले. 

खालील स्क्रिनशॉटमध्ये आपण व्हायरल व्हिडिओशी मिळतीजुळती गर्दी पाहू शकता.

मूळ पोस्ट – इंस्टाग्राम

गुगल मॅपवर सर्च केल्यावर हिंदकेसरी पेडगाव मैदान हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामधील पेडगाव येथे असल्याचे सापडले. या मैदानवर आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती आणि प्रेक्षकांच्या गर्दीचे अनेक फोटो युजर्सनी गुगल मॅपवर शेअर केले आहेत.  

मूळ पोस्ट – गुगल मॅप

खालील तुलनात्मक फोटोमधील व्हायरल व्हिडिओ आणि गुगल मॅपवर लोकांच्या गर्दीसोबत पार्श्वभागात दिसणाऱ्या डोंगरामधील साम्य पाहता हे दोन्ही एकाच ठिकाणाचे आहेत, हे सिद्ध होत.

निष्कर्ष

व्हायरल व्हिडिओमधील गर्दी मराठा मुंबई मोर्चाची नाही. मुळात हा व्हिडिओ सातारा जिल्ह्यातील पेडगावाच्या हिंदकेसरी मैदानावरील बैलगाडा शर्यतीचा आहे. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मुंबईतील मराठा मोर्चाची विक्रमी गर्दी म्हणून बैलगाडा शर्यतीचा जुना व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: Misleading


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *