इटलीच्या बोलोना शहराती अपघाताचा व्हिडिओ जयपूरमधील एलपीजी ट्रकचा स्फोट म्हणून व्हायरल

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील जयपूर–अजमेर महामर्गावर एक भीषण अपघात झाला होता. याच पार्श्वभूमी एक महामार्गावरील अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ जयपूरमध्ये झालेल्या त्याच अपघाताचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 6 वर्षांपूर्वीचा असून जयपुरचा नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एका महामार्गावर काही वाहनांची धडक बसते आणि मोठा स्फोट होतो. 

व्हिडिओच्या ग्राफिकमध्ये लिहिले होते की, हा अपघात जयपुरमध्ये 20 डिसेंबर रोजी सकाळी 5:30 वाजता झाला होता. स्फोट झालेल्या वाहनात 18 टन सीएनजी गॅस होते.

मूळ पोस्ट – इंस्टाग्राम | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी 

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2018 पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

व्हिडिओ न्यूज नामक एका युट्यूब चॅनलने हाच व्हिडिओ 6 ऑगस्ट 2018 रोजी शेअर केला होता. 

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “टँकरने ट्रकला धडक दिल्याने बोलोनामध्ये अपघात झाला.”

मूळ पोस्ट – व्हिडिओ न्यूज

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर हा अपघात इटलीतील बोलोना शहरात झाला होता.

डेली मेलच्या बातमीनुसार ही दुर्घटना ऑगस्ट 2018 मध्ये इटलीतील बोलोना विमानतळाजवळील महामार्गावर घडली होती. पुलावरुन जात असताना एका पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टँकरने समोरील वाहणाला धडक दिली आणि एक मोठा स्फोट झाला. 

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार या दुर्घटनेत वाहण चालवणाऱ्या 41 वर्षीय चालकाचा मृत्यू तर 70 लोक जखमी झाले ज्यात काही गंभीर भाजले गेले होते.

तसेच बीबीसीच्या बातमीनुसार या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर 60 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. अधिक माहिती येथेयेथे वाचू शकतात.

जयपूर अपघात

जयपूर-अजमेर महामार्गावर 20 डिसेंबर रोजी सकाळी 4:30 वाजता एलपीजी टँकरला ट्रकने धडक दिल्याने गॅस लीक झाली आणि मोठा स्फोट झाला. या स्फोटाची आग रस्त्याच्या 300 मीटर पट्ट्यात पसरली आणि जवळपास 35 वाहने यामध्ये जळून खाक झाली होती.

तसेच या दुर्घटनेत 18 पेक्षा जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 30 जण जखमी झाले आहेत.

अधिक महिती येथेयेथे वाचू शकतात.

निष्कर्ष

यावरुन सद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ राजस्थानमधील जयपूर शहरात झालेल्या एलपीजी ट्रकच्या अपघाताचा नाही. मुळात ही दुर्घटना 2018 मध्ये इटलीतील बोलोना शहरात घडली होती. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:इटलीच्या बोलोना शहराती अपघाताचा व्हिडिओ जयपूरमधील एलपीजी ट्रकचा स्फोट म्हणून व्हायरल

Written By: Sagar Rawate  

Result: Misleading