+140 नंबरवरून कॉल करून बँक खाती लुटण्याच्या अफवा पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

पोलिस आवाहन करतानाचा व्हिडिओसध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिस म्हणतात की, “140 क्रमांकाने सुरू होणाऱ्या नंबरवरून तुम्हाला कॉल आल्यास तो उचलू नये. अन्यथा आपले फोन हॅक होईल आणि बँक खाते रिकामे होईल.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा दिशाभूल करणारा असून ‘140’ नंबरवरून कॉल केल्याने बँक खाते रिकामे होत नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिस आवाहन करतात की, आपल्याला 140 क्रमांकाने सुरू होणाऱ्या नंबर वरुन फोन आल्यास तो उचलू नका, अन्यथा आपले बँक खाते रिकामे होईल.”

मूळ पोस्ट – इंस्टग्राम | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा नवीन नसून 2020 मध्ये कोविड-19 महामारीदरम्यान पहिल्यांदा व्हायरल झाले होते. 

व्हायरल दाव्याची दखल घेत महाराष्ट्र सायबर पोलिसांनी 10 जुलै 2020 रोजी ट्विट करत स्पष्ट केले की, “या केवळ अफवा असून ‘+140’ ने सुरू होणारे मोबाइल नंबर फक्त टेलीमार्केटिंगच्या उद्देशाने केला जातो.”  

तसेच या कॉलवर वैयक्तिक तपशील, पिन आणि ओटीपी कोणालाही देऊ नका. असा इशारा पोलिसांनी दिला.

पुढे आम्हाला महाराष्ट्र सायबर पोलिसचे व्हायरल दाव्यासंदर्भात आणखी एक ट्विट आढळले. ज्यामध्ये सायबर पोलिसांनी सांगितले की, “जोपर्यंत तुम्ही सीव्हीव्ही, पिन नंबर, ओटीपी आणि इतर बँक तपशील देत नाही, तोपर्यंत बँक खात्यात प्रवेश करणे शक्य नाही. तरीही, तुम्ही क्रेडिट/डेबिट कार्ड क्रमांक कोणालाही शेअर करू नयेत.” 

महागात पडलेली मस्करी 

जुलै 2020 मध्ये, लोकांना +911408800135 नंबरवरून कॉल येत होते. ज्यामध्ये समोरील व्यक्ती त्याने पाहिलेल्या खुनाबद्दल सांगते.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार लोकांना असे कॉल आव्यावर ते घाबरले आणि पोलिसांकडे तक्रार करू लागले. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दुपारी लोकांकडून कॉल येऊ लागले की त्यांना 140 किंवा 40 पासून सुरू होणाऱ्या नंबरवरून विचित्र कॉल्स आले आहेत.

यानंतर पोलिसांनी स्पष्ट केले की, हे त्रासदायक कॉल्स ‘सोनी लिव’ नावाच्या चॅनेलने चालविलेल्या जाहिरात मोहिमेचा एक भाग आहे. या चॅनेलवरील एका मालिकेच्या प्रोमोशनसाठी असे कॉल करण्यात आले होते. आम्ही त्यांना ही जाहिरात बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कृपया याविषयी अफवा पसरवून भीती घालू नये.

आपली जाहिराती  अंगलट आल्यानंतर ‘सोनी लिव’ने लोकांची माफी मागायला सुरुवात केली. त्यांनी सांगितले की, ‘अनदेखी’ नावाच्या नव्या मालिकेच्या जाहिरातीचा भाग म्हणून हे कॉल करण्यात आले होते. तुम्हाला याचा त्रास झाल्याबद्दल आम्ही माफी मागतो. आपल्याला घाबरविण्याचा आमचा उद्देश नव्हता. माध्यमांनीदेखील याबाबत बातम्या दिल्या.  

ऑनलाईन फ्रॉड पासून वाचण्यासाठी आणि सायबर सुरक्षा बाबत जागरूक राहण्यासाठी मायफॅक्टरी या वेबसाइटला भेट द्या. 

निष्कर्ष

यावरून हे स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ सोबत केलेला दावा दिशाभूल करणारा असून ‘140’ नंबर केवळ टेलीमार्केटिंग कॉलसाठी वापर जातो. बँक किंवा वैयक्तिक माहिती शेअर केल्याशीवाय आपल्या बँक खात्यात प्रवेश करने शक्य नाही. त्यामुळे अशी कोणतीही माहिती कोणासोबत शेअर करु नका.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:+140 नंबरवरून कॉल करून बँक खाती लुटण्याच्या अफवा पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

Written By: Agastya Deokar 

Result: Misleading