
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे दारू पीत असल्याचा एक कथित फोटो व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो बनावट आहे. दुसऱ्याच व्यक्तीच्या फोटोला एडिट करून मनोज जरांगे पाटील यांचा चेहरा लावण्यात आला आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटोमध्ये लिहिले आहे की, “ओळखा पाहू हा कोण ? म्हणतो कसा शप्पथ घेऊन सांगतो दारुच्या थेंबाला पण शिवला नाही म्हणे. म्हणतो कसा नार्को टेस्ट करा.”
मूळ पोस्ट – इंस्टाग्राम | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटोमध्ये मनोज जरांगे पाटील नाहीत.
रिसर्चगेट या वेबसाईटवर असा डोरोन नामक युजरने एप्रिल 2010 मध्ये मूळ फोटो अपलोड केला होता. फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “पहाटे मद्यपान करणारा रिक्षाचालक. शासन मान्यताप्राप्त दारूची दुकाने दररोज सकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत सुरू असतात.”
खालील फोटो पाहिल्यावर कळते की, हा इसम मनोज जरांगे नाही.

मूळ पोस्ट – रिसर्चगेट
खालील तुनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ फोटोला एडिट करून मनोज जरांगे पाटील यांचा चेहरा लावण्यात आला आहे.

व्हायरल फोटो कसा तयार केला गेला ?
व्हायरल फोटोमध्ये पिका एआय (Pica Ai) असे लिहिलेले दिसते. हा धागा पकडून सर्च केल्यावर कळाले की, ही वेबसाईट फेस स्वॅपींग म्हणजे एका व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या फोटोला लावून देते.
फॅक्ट क्रेसेंडोने मनोज जरांगे यांचा फोटो आणि दारु पिणाऱ्या व्यक्तीचा मूळ फोटो पिक्य एआय वेबसाईटवर अपलोड केल्यावर त्याने व्हायरल फोटो प्रमाणे ते छायाचित्र तयार करुन दिले.
खालील व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, पिका एआय वेबसाईटवर तयार केलेले छायाचित्र आणि व्हायरल फोटो एकच आहे.
मूळ पोस्ट – आर्काइव्ह
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटो बनावट आहे. दुसऱ्याच व्यक्तीच्या फोटोला एडिट करून मनोज जरांगे पाटील यांचा चेहरा लावण्यात आला आहे. खोट्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:फोटोमध्ये दारू पिणारी व्यक्ती मनोज जरांगे पाटील नाहीत; बनावट फोटो व्हायरल
Written By: Sagar RawateResult: Misleading
