वक्फ दुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळाल्यावर असदुद्दीन ओवेसींना रडू कोसळले का?

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेत मंजूरी मिळाली असून राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.

या पार्श्वभूमीवर एआयएमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा संसदेत डोळे चोळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दावा केला जात आहे की, “वक्फ दुरुस्ती विधेयकाला संसदेत मंजुरी मिळाल्यावर एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना दु:खात अश्रू अनावर झाले.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 7 महिण्यापुर्वीचे आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये असदुद्दीन ओवेसी डोळे चोळताना दिसतात. व्हिडिओमधील ग्राफिकमध्ये लिहिले होते की,“लोकसभेत आणि राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर; सारी वक्फ संपत्तीपे पाणी फिर गया |”

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “ओवेसीजी असे रडू नये.”

पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर एआयएमआयएम आरआर डिस्ट्रिक्ट नामक इन्स्टाग्राम अकाउंटने हा व्हिडिओ 7 ऑगस्ट 2024 रोजी शेअर केल्याचे आढळले. 

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “हे द्दश्य आजच्या लोकसभेतील आहेत.”

मूळ पोस्ट – इंस्टग्राम | आर्काइव्ह

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर ओडिशा लाईव्ह नामक युट्यूब चॅनलने या अधिवेशनाचा संपूर्ण व्हिडिओ 7 ऑगस्ट 2024 रोजी पोस्ट केला होता.

व्हिडिओमध्ये 4 तास 46 मिनिट 58 सेकंदावर आपण व्हायरल क्लिपमधील भाग पाहू शकता.

या ठिकाणी ओवेसी डोळे चोळताना दिसतात. परंतु, या ठिकाणी ते भावनेच्या भरात रडताना कुठेही आढळत नाही.

मूळ पोस्ट – ओडिशा लाईव्ह

वक्फ दुरुस्ती विधेयक

लोकसभेत 3 एप्रिल रोजी विधेयकावर चर्चा सुरू असताना एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या भाषणात हे विधेक मुस्लीम समाजाच्या अधिकारांवर गदा आणणारे असल्याचे सांगितले आणि त्यांनी विधेयकाची प्रत फाडली. संपूर्ण बातमी येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ 7 महिन्यांपूर्वीचा असून एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी त्यामध्ये रडत नव्हते. जुना व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल होत आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:वक्फ दुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळाल्यावर असदुद्दीन ओवेसींना रडू कोसळले का?

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: Misleading