
भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर आता पक्षाने रेखा गुप्ता यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर एक महिला तलवारबाजी आणि लाठीकाठी चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दावा केला जात आहे की, ही शस्त्र चालवणारी महिला रेखा गुप्ता आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हायरल दाव्यासह हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील तलवारबाजी आणि लाठीकाठी चालवणारी महिली रेखा गुप्ता नसून अभिनेत्री पायल जाधव आहे.
काय आहे दावा ?
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील महिला रेखा गुप्ता नसून अभिनेत्री पायल जाधव आहे.
पायल जाधवने 19 फेब्रुवारी रोजी हाच व्हिडिओ शिवजयंती निमित्त आपल्या अधिकृत इंस्ट्राग्राम खात्यावर शेअर केला होता.
मूळ पोस्ट – इंस्टग्राम
एका युजरने या व्हिडिओच्या कमेंटमध्ये “ही मुलगी दिल्लीची नवीन मुख्यमंत्री असल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर इथे कोण आले आहे ?” असा सवाल केल्यावर पायल जाधवने त्यावर गमतीशीर उत्तर देताना ‘मी’ असे लिहिले.
लोकमतने 19 फेब्रुवारी रोजी हीच बातमी शेअर केली होती. अधिक महिती येथे वाचू शकता.
मूळ पोस्ट – लोकमत
खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्याला दिल्ली मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि पायल जाधव यांच्यातील फरक कळेल.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये तलवारबाजी करणारी महिला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता नसून मराठी अभिनेत्री पायल जाधव आहे. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:व्हायरल व्हिडिओमध्ये तलवार चालवणारी महिला दिल्लीच्या नविन मुख्यमंत्री रेखा गुप्ता नाहीत; वाचा सत्य
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Misleading
