
अलिकडेच देशभरात दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर अरब देशातील भव्य आतषबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दावा केला जात आहे की, “सौदी अरेबियामध्ये दिवाळीचा उत्सव भव्य आतषबाजीने साजरा करण्यात आला.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ दिवाळीचा नसून युएईच्या 52 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त केलेल्या आतषबाजीचा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये अरब देशातील पोशाख घातलेले लोक आपल्या फोनमध्ये आतषबाजीचे दृष्य टिपताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “1400 वर्षांपूर्वी जिथे उत्पत्ती झाली, तिथे सौदी अरब मध्ये दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी करत आहेत.”
https://archive.org/details/fb-post-vd-1-291025
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ जुना असून यामधील आतषबाजी सौदी अरेबियामध्ये दिवाळीनिमित्त केली गेली नव्हती.
एका युट्यूब चॅनलने हाच व्हिडिओ 3 डिसेंबर 2023 रोजी शेअर केल्याचे आढळले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये माहिती दिली होती की, “हा दुबईमध्ये आयोजित केलेल्या 52 व्या यूएई राष्ट्रीय दिनाच्या समारंभाचा व्हिडिओ आहे.”
सर्चमध्ये आम्हाला युजर्सने हिच क्लिप 3 – 5 डिसेंबर 2023 रोजी शेअर केलेली आढळली. त्या क्लिप्स आपण येथे व येथे पाहू शकता.

मूळ पोस्ट – युट्यूब | आर्काइव्ह
अधिक सर्च केल्यावर 2021 मधील यूएईच्या 50 राष्ट्रीय दिन साजरा करतानाचा एक मोठ्या आवृत्तीचा व्हिडिओ आढळला. व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार, ही आतषबाजी यूएईच्या राजधानी अबू धाबीचा आहे.

मूळ पोस्ट – युट्यूब
पुढे सर्चमध्ये ट्रॅव्हल विथ माझ नामक एका युट्यूब चॅनलने अबू धाबीमधील 52 व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाचे दृश्ये दाखलणारा व्हिडिओ शेअर केल्याचे आढळले.
खालील स्क्रिनशॉटमध्ये आपण आतषबाजीचे दृष्य पाहू शकतो.

मूळ पोस्ट – युट्यूब
यूएई राष्ट्रीय दिन
संयुक्त अरब अमिराती (यूएई) 2 डिसेंबर 1971 रोजी स्वातंत्र्य झाला होता. म्हणून यूएई दरवर्षी 2 डिसेंबर रोजी आपला राष्ट्रीय दिन साजरा करतो.
तसेच व्हायरल व्हिडिओमध्ये एका खांबावर यूएईचे राष्ट्रीय चिन्ह गरुड आणि त्याच्या खाली 52 क्रमांक लिहिलेला दिसतो.
त्यामुळे हे स्पष्ट होते की, आतषबाजीचा हा व्हिडिओ यूएईमध्ये 2 डिसेंबर 2023 रोजी साजरा केलेल्या 52 व्या राष्ट्रीय दिनासंबंधित आहे.

निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ दिवाळीचा नाही. मुळात ही आतषबाजी 2023 मध्ये युएईच्या 52 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त करण्यात आली होती. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
 
					  Title:युएईमधील राष्ट्रीय दिनानिमित्त केलेल्या आतषबाजीचा व्हिडिओ दिवाळी उत्सव म्हणून व्हायरल
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Misleading



 
	 
						 
						