पाकिस्तानी झेंडा हातात घेवून, दुचाकीवर तरुणांची रपेट : सत्य पडताळणी

खरी न्यूज I Real News

कथन

सध्या भारतात अत्यंत संवेदनशील विषयावर सोशल मिडीयावर पोस्ट वायरल होत आहे. त्यामध्ये पुण्यातील हिंजवडीतील रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा हातात घेवून फिरणारे काही तरुण पुण्यातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. याबद्दल फॅक्ट क्रीसंडो टीम ने केलेली सत्य पडताळणी ….

Facebook

अर्काइव्ह लिंक

सत्य पडताळणी

हातात पाकिस्तानी झेंडा घेवून दुचाकीवर तरुण फिरतांना दिसल्याचे वृत्त खरे आहे. यासंदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये वृत्त आले आहे. ह्या वृत्त सोशल मिडीयावर प्रचलित झाले आहे.

सौजन्य : लोकसत्ता

सविस्तर वृत्त येथे वाचू शकतात.
लोकसत्ता l अर्काइव्ह लिंक
एमपीसी न्यूज l अर्काइव्ह लिंक

पुण्यातील हिंजवडीमधील रस्त्यांवर काही तरुण पाकिस्तानी झेंडा घेऊन दुचाकीवरून जात असतानाचे दृश्य, शनिवारी (दि.१६) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले आहे. पुणे पोलीस मुख्यालयातील सीसीटीव्ही कक्षात हा प्रकार घडल्याचे उपस्थितांना लक्षात आले. पुणे पोलिसांनी पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षाला याबाबत तत्काळ माहिती दिली.

सौजन्य : पीसीबी टुडे

पोलिसांनी हिंजवडीसह आजूबाजूच्या पोलिस ठाण्यात अलर्ट जारी केला. त्यानुसार  हिंजवडी, वाकड आणि सांगवी पोलिस ठाण्यातील पोलिसांनी त्या तरुणांचा शोध सुरू केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्या तरुणांचा शोध लागला नाही. सध्या त्या तरुणांच्या शोधात पोलिसांची एक टीम हिंजवडी, वाकड आणि सांगवी परिसरात घेत आहे.

सविस्तर वृत्त आपण येथे वाचू शकतात.

पीसीबी न्यूज l अर्काइव्ह लिंक

निष्कर्ष : पाकिस्तानी झेंडा हातात घेवून, काही तरुण दुचाकीवरून जात असतांनाचे वृत्त खरे असून, पुणे शहरात पोलिसांकडून त्या तरुणांचा शोध सुरु आहे. अजूनपर्यंत त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती पोलिसांच्या हाती लागली नाहीये.

Real new Title: पाकिस्तानी झेंडा हातात घेवून, दुचाकीवर तरुणांची रपेट : सत्य पडताळणी
Fact Check By: Amruta Kale 
Result: True