सोशल मीडियावर एका विमानाचा व्हिडिओ शेअर करत दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ तेजस-एचएएल लढाऊ विमानचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ तेजस विमानाचा नसून एका व्हिडिओगेमचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक लढाऊ विमान उड्डाण करताना दिसते.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “Tejas -HAL product. Vertical take off, a treat to watch. जाग्यावरुनच उड्डाण करण्याची क्षमता, शत्रूच्या हल्ल्यापासून बचावासाठी हवेतच कसरती करण्याची क्षमता ! संपूर्ण भारतीय बनावटीचं फायटर जेट !”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ तेजस लढाऊ विमानाचा नाही.

BASU नामक फेसबुक पेजने हाच व्हिडिओ 26 ऑगस्ट रोजी शेअर केला होता.

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “AV-8B हॅरियर फायटर जेटचे दुर्मिळ टेकऑफ.”

अधिक सर्च केल्यावर कळाले की, BASU हे एक व्हिडिओ गेमचे फेसबुक पेज असून यापेवर अनेक विमानांचे उड्डाण करतानाचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत.

तेजस विमान

तेजस हे लढाऊ विमान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे (एचएएल) नाशिकमध्ये तयार केले जाते अधिक माहिती येथेयेथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ तेजस विमानाचा नसून एका व्हिडिओगेमधील AV-8B हॅरियर फायटर जेटचा आहे. चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Claim Review :   “Tejas -HAL product. Vertical take off, a treat to watch. जाग्यावरुनच उड्डाण करण्याची क्षमता, शत्रूच्या हल्ल्यापासून बचावासाठी हवेतच कसरती करण्याची क्षमता ! संपूर्ण भारतीय बनावटीचं फायटर जेट !”
Claimed By :  Social Media User
Fact Check :  FALSE