काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप समोर हार स्वीकार केली का? वाचा सत्य
भाजपने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’ हे घोषवाक्य जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संसद भवनमध्ये ते भाजपचे घोषवाक्य ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’ बोलतात आणि भाजपमध्ये सर्व नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशिर्वादाने निवडून आले आहेत, असे म्हणतात.
हा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारसमोर आपली हार स्वीकार केली.”
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधकांचा पराभव मान्य करताना भाजप 400 हून अधिक जागा जिंकेल, असे विधान केलेले नाही.
काय आहे दावा ?
एका मिनिटाच्या क्लिपमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संसद भवनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाची स्तुती करताना दिसतात.
बीजेपी महाराष्ट्र या अधिकृत फेसबुकवर आणि भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या सोशल मीडिया पेजवर हाच व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मोदीजींची जादू. इंडिया अलायन्स म्हणजे खायला कहार भूईला भार काँग्रेस अध्यक्ष खर्गेनीही केले मान्य मोदीजींच्या नेतृत्त्वात अब कि बार 400 पार.”
मुळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाचा आहे.
खालील व्हिडिओमध्ये 45 मिनिटे 54 सेकंदावर मल्लिकार्जुन खरगे भाषण देतात.
वरील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येते की, मल्लिकार्जुन खरगेंनी यांनी आपण पराभूत झालो किंवा हार मानली असे कुठे ही म्हणत नाही.
खरगे म्हणतात की, काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने महिला आरक्षणाबाबत सरकारला लवकरात लवकर निर्णय देण्यास सांगितले होते. तरी देखील भाजप सरकार महिला आरक्षणाबाबत कोणती ही भूमिका का घेत नाही. भाजप सरकार कडे बहुमत आहे, पूर्वी 330, 334 होते, आता तर 400 पार होत आहे.
या वक्तव्यानंतर भापज सरकारमधील टाळ्या वाजवताना दिसतात.
पुढे खरगे टाळ्या वाजविणाऱ्या नेत्यांना उद्देशून म्हणतात की, “हे सर्व नेते मोदींच्या आशिर्वादाने या ठिकाणी आले, म्हणून टाळ्या वाजवत आहेत.”
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी खरगेंना सत्ताधरी पक्षाची प्रशंसा केल्या बद्दल अभिनंदन करताना सांगतात की, “आपल्या वक्तव्याची प्रशंसा केली जात आहे.”
या वक्तव्यावर खरगे म्हणतात की, “भाजप सरकार स्वत:चीच प्रशंसा करत आहे. आपले इतके उम्मेदवार जर निवडून येणार असेल तर मग भाजपसरकार महिला आरक्षणाबाब निर्णय का घेत नाही. या वेळेस आपण (भाजप) 100 पण पार नाही करू शकणार. इंडिया आघाडी सशक्त आहे.”
सरदरील वक्तव्य आपण येथे पाहू शकतात.
खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट वाक्य पसरविले जात आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी आगामी निवडणुकीपूर्वीच आपला पराभव मान्य केला नाही. ते महिला आरक्षणाबाबत भाजप सरकार भूमिका का घेत नाही? असा सवाल करत होते. अर्धवट व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप समोर हार स्वीकार केली का? वाचा सत्य
Written By: Sagar Rawate
Result: False