रामाच्या मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला दानपेटीत नोटांचे बंडल टाकताना दिसते. दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडओ राम मंदिराचा नाही. हे दान राजस्थानच्या श्री सणवालिया सेठ मंदिराच्या दानपेटीत टाकण्यात आले होते.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये दोन क्लिप दाखल्या आहेत. पहिल्या क्लिपमध्ये महिला दानपेटीमध्ये नोटांचे बंडल टाकते तर दुसरी कडे प्राणप्रतिष्ठा केलेली राम मूर्ती दाखवण्या आली आहे.

युजर्स हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “दान पेटी राम मंदिर अयोध्या.”

मुळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, एशियानेट न्यूजने 11 सप्टेंबर 2023 रोजी एक बातमी प्रकाशित केली होती. ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओमधील महिला दिसते.

बातमीच्या मथळात लिहिल होत की, “या महिलेने 2 मिनिटात 10 लाख रुपये भगवान कृष्णाला अर्पण केले.”

बातमीनुसार हा व्हिडीओ चित्तौडगडमधील सनवालिया सेठ म्हणजेच भगवान कृष्णाच्या मंदिराचा आहे. या ठिकाणी भाविक आपली इच्छा पूर्ण झाल्यावर करोडो रुपयांचे दान देतात.

अधिक महितीसाठी कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्यातील उदयपूर शहरापासून सुमारे 75 किलोमीटर अंतरावर हे ‘श्री सांवलिया सेठ मंदिर’ स्थित असून येथे भगवान कृष्णाची मूर्ती आहे. 

तसेच या मंदिराचे मुख्य पुजारी दिनेश यांनी 27 जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडओ शेअर केला ज्यामध्ये आपण व्हायरल व्हिडिओमधील दानपेटी पाहू शकतो.

https://www.instagram.com/reel/C2msnR-PhN8/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

खालील तुनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओ आणि श्री सांवलिया सेठ मंदिराची दानपेटी एकच आहे.

राम मंदिर

राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर पैश्याने भरलेल्या दानपेट्यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आज तक चॅनलने राम मंदिर ट्रस्ट कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्तांशी संपर्क साधल्यवार त्यांनी सांगितले की, 22 जानेवारी दान काउंटरवर 6 लाख रुपयांची नोद असून मंदिराच्या उद्घाटनाला आलेल्या प्रमुख लोकांनी आणि समित्यांनी ड्राफ चेकच्या माध्यमातून 3 करोड पर्यंत दान केले होते. तसेच 23 जानेवारी रोजी 27 लाख आणि 24 तारखेला 16 लाख रोखरक्कम जमा झाल्याची नोंद आहे.

राम मंदिराच्या नावाने पैश्याने भरलेल्या व्हायरल व्हिडिओ विषयी विचारल्यावर प्रकाश गुप्तांनी स्पष्ट केले की, राम मंदिरमध्ये दान करण्यासाठी दानपेटीत पैसे टाकले जात नाही. दान करण्यासाठी एसबीआय द्वारे केंद्र बनवण्यात आले आहे. त्या ठिकाणी योग्य माहिती घेऊन दान केल्याची पावती दिली जाते. त्या शिवाय दान स्विकारले जात नाही.

तसेच राम मंदिरमध्ये दानपेटीमध्ये जमा झालेला पैसा मोजनी केली जात नाही. एसबीआय बँकमध्ये दानपेट्या पाठवल्या जातात. तेथे बॅंक कर्मचारी आणि ट्रसचे विशेष लोकांसमोर पैशाची मोजणी केली जाते आणि पैसा ट्रसच्या खात्यावर जमा केले जातात. संपुर्ण वक्तव्य येथे पाहू शकतात.

एनडीटीव्हीच्या पत्रकार सुकन्या सिंह जादौन यांनी राम मंदिरात दान कसे केले जाते प्रत्यक्षरीत्या खालील व्हिडिओमध्ये सांगितल आहे.

https://youtu.be/1b8G_tji8gM?si=9xoE2OmnL8ctUfRV

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होत की, व्हायरल व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिर नाही. हे दान राजस्थानच्या श्री सणवालिया सेठ मंदिराच्या दानपेटीत टाकण्यात आले होते. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

( तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:दान पेटीमध्ये नोटांचे बंडल टाकतानाचा व्हिडिओ व्हिडिओ अयोध्येचा नसून श्री सणवालिया सेठ मंदिराचा; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading