कॅनडा सरकारने RSS वर बंदी घातली नाही; व्हिडिओसोबत भ्रमक दावा व्हायरल

Update: 2023-09-30 13:08 GMT

खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी भारतावर आरोप केल्यामुळे कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध ताणले आहेत. यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कॅनडामध्ये RSS संघटनेवर बंदी घालण्यात आली असून त्यांच्या कार्यकर्त्यांना कॅनडा सोडण्याचे आदेश दिले आहेत”, असा दावा केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, कॅनडा सरकारने राष्ट्रीय सेवा संघावर बंदी घातली नाही. भ्रमक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कॅनडामध्ये RSS वर बंदी घालण्याचा उल्लेख करतो.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मोठी ब्रेकिंग न्यूज कॅनडाच्या सरकारने आरएसएसवर बंदी घातली असून त्यांच्या कार्यकर्त्यांना कॅनडा सोडण्याचे आदेश दिले आहेत.”

Full View

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कॅनडा सरकारने जर आरएसएस संघटनेवर बंदी घालण्यात आली असती तर ही नक्कीच एक मोठी बातमी झाली असती. परंतु, अशी कोणतीही बातमी आढळली नाही.

पुढे रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, NCCMTV नावाच्या युट्यूब चॅनेलने 20 सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ अपलोड केला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "एनसीसीएमचे प्रमुख स्टीफन ब्राउन यांनी कॅनडातील शीख व्यक्तीच्या कथित हत्येप्रकरणी कारवाईची मागणी केली."

स्टीफन ब्राउन यांनी भाषणात अनेक मागण्या केल्या. त्यापैकी एक म्हणजे देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणे.

https://youtu.be/N6TSpMU8YYY

एनसीसीएम म्हणजे काय ?

एनसीसीएम म्हणजे नॅशनल कौन्सिल फॉर कॅनेडियन मुस्लिम संस्था होय. ही एक विनामूल्य, स्वतंत्र आणि कॅनेडियन मुस्लिमांसाठी काम करणारी संस्था आहे.

तसेच ही संस्था कॅनडा सरकारशी संबंधित नाही. एनसीसीएमचे प्रमुख स्टीफन ब्राउन शासकीय अधिकारी नाही. संबंधित अधिक माहिती येथे पाहू शकतात.

अल जझीराच्या बातमीनुसार 19 सप्टेंबर 2023 रोजी वर्ल्ड शीख ऑर्गनायझेशन ऑफ कॅनडाचे अध्यक्ष मुखबीर सिंग यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, जिथे नॅशनल कौन्सिल ऑफ कॅनेडियन मुस्लिम प्रमुख स्टीफन ब्राउन यांनी कॅनडामध्ये आरएसएस संघावर बंदी घालण्याची सरकार कडे मागणी केली होती.

सध्याची परिस्थिती

कॅनडाने भारतवर आरोप केल्यानंतर यांच्यातील संबंध अधिकच ताणले होते. परंतु, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपण भारतासोबत संबंध जोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी प्रतिक्रीया दिली. 28 फेब्रुवारी रोजी मॉन्ट्रिअल येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना ट्रुडो म्हणाले की, “जागतिक स्तरावर भारताचं महत्त्व वाढत आहे. त्यामुळे कॅनडा आणि मित्र राष्ट्रांनी रचनात्मक आणि गांभीर्याने सहभाग घेणं महत्त्वाचं आहे. भारत एक वाढती आर्थिक शक्ती आणि महत्त्वाचा राजकीय खेळाडू आहे. इंडो पॅसिफिक रणनीतीनुसार भारताशी घनिष्ठ संबंध निर्माण करण्याबाबत आम्ही खूप गंभीर आहोत. तसेच कायद्याचे राज्य म्हणून आम्हाला या प्रकरणाची संपूर्ण तथ्ये मिळतील याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे भारताने कॅनडासोबत काम करणे आवश्यक आहे.” अधिक माहिती येथे पाहू शकतात.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ कॅनडामध्ये आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी करणारी व्यक्ती सरकारी अधिकारी नाही. कॅनडा सरकारने असा कोणताही निर्णय जारी केला नाही. भ्रमक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:कॅनडा सरकारने RSS वर बंदी घातली नाही; व्हिडिओसोबत भ्रमक दावा व्हायरल

Written By: Agastya Deokar

Result: Misleading

Tags:    

Similar News