मुंबईत कोरोना रुग्णांचे अवयव चोरण्यात येत असल्याच्या अफवांना फुटले पेव; वाचा सत्य

Update: 2020-07-30 11:21 GMT

मुंबईत कोरोना रुग्णांचे अवयव चोरण्यात येत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साधे पडसं-खोकला असणाऱ्या रुग्णांना बळजबरीने कोरोना पॉझिटिव्ह दाखवून त्यांचे अवयव चोरी केली जात असल्याचा गंभीर आरोप या मेसेजमध्ये करण्यात येत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता या सर्व अफवा असल्याचे कळाले.

काय आहे प्रकरण?

मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असतानाचे फोटो शेयर करून म्हटले की, भाईंदरच्या गोरामध्ये मागील काही दिवस एकही कोरोना पेशंट नव्हता. परंतु, एक जण सर्दी-खोकला झाल्यामुळे तपासणीसाठी गेला असता त्याला बळजबरीने दवाखान्यात भरती करून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवण्यात आला. मग त्याचा मृत्यू झाला. आरोग्य कर्मचारी त्याचा मृतदेह पॅक करून जाळण्याच्या तयारीत असताना नातेवाईकांना शंका आली. त्यांनी मृतदेहाची तपासणी केली तेव्हा लक्षात आले की, त्याचे काही अवयव गायब आहेत. कोरोनाच्या नावे अशा प्रकारचे मोठे रॅकेट सुरू आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सदरील पोस्टमध्ये कुठेही त्या रुग्णाचे अथवा दवाखान्याचे नाव दिलेले नाही. फॅक्ट क्रेसेंडोने यापूर्वीदेखील गोराईच्या मनोरी गावातील अशाच एका प्रकरणाची तथ्य पडताळणी केली होती. तेथेदेखील नातेवाईंकाच्या गोंधळाचा व्हिडियो अवयव तस्करीच्या दाव्यासह शेयर करण्यात आला होता. परंतु, ते खोटं असल्याचे सिद्ध झाले होते.

फॅक्ट क्रेसेंडोने गोराई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव नारकर यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सांगितले की, गोराई भागात अवयव चोरीचे कोणतेही रॅकेट सुरू नाही. सोशल मीडियावर गोराई, भाईंदर, मनोरीच्या नावे या सर्व अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवांसंदर्भात आम्ही सायबर गुन्हे शाखेला कळविले असून, खोटी माहिती पसरविणाऱ्यांविरोधात कडक करण्यात येणार आहे.

मग पोस्टमध्ये हे फोटो कुठले आहेत?

गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे कळाले की, वर्षा शर्मा नावाच्या एका युजरने 18 जुलै रोजी हे फोटो शेयर केले होते. पोस्टमधील माहितीनुसार, लखनऊ येथील एका बेवारस 43 वर्षीय महिलेचा हा अंतिमविधी होता.

Full View

फॅक्ट क्रेसेंडोने वर्षा शर्मा यांच्याशी संपर्क केला. त्या लखनऊ येथील एक सामाजिक कार्यकर्त्या असून, त्यांची एनजीओ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करते. त्यांनी सांगितले की, एका बेवारस महिलेला उपचारांसाठी लखनऊमधील सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. आमच्या संस्थेने मग या महिलेवर भैसा कुंडस्थित इलेक्ट्रिक मशीनद्वारे दाहसंस्कार केले होते. त्याचे हे फोटो मी फेसबुकवर अपलोड केले होते. दिल्ली क्राईम प्रेस नावाच्या एका वेबसाईटने ते फोटो वापरून मुंबईतील अवयव तस्करी ची खोटी बातमी केली. त्यामुळे या वेबसाईटविरोधात मी रीतसर पोलिसांकडे तक्रारदेखील केली आहे.

वर्षा यांनी फॅक्ट क्रेसेंडोशी एफआयआरची प्रतदेखील शेयर केली. तसेच या फोटो मागचे सत्य उलगडून सांगणारा एक व्हिडियो मेसेजदेखील पाठवला. तो तुम्ही खाली पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=QYGBUzoodfA

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, लखनऊमधील एका बेवारस महिलेच्या अंत्यसंस्काराचे फोटो मुंबईतील सांगत कोरोना रुग्णांचे अवयव चोरण्यात येत असल्याचा खोटा दावा केला जात आहे. वाचकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:मुंबईत कोरोना रुग्णांचे अवयव चोरण्यात येत असल्याच्या अफवांना फुटले पेव; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False

Tags:    

Similar News