सलमान खानने लॉरेन्स बिष्णोईला खरंच धमकी दिली का ? वाचा सत्य

Update: 2024-10-17 13:56 GMT

सलमान खान संतापाने बोलतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, सलमान खानने कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईला धमकी दिली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हायरल आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ कोरोना काळातील असून दोन वर्षांपूर्वी सलमान खान लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर संतापला होता.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये सलमान म्हणतो की, तुम्ही खुप बहादुर आणि शक्तिशाली आहात, इतके शक्तिशाली की, तुम्ही आपल्या परिवाराच्या तिरडीला खांदा द्याल ? इतकी हिम्मत आहे तुमच्यात? का तुम्ही यमराज बनू इच्छितात ? का तुम्ही आपल्या परिवारवर इन्ना लिल्लाही आणि राम नाम सत्य वाचू इच्छितात ?

युजर्स हा व्हिडिओ शेअर करतान कॅप्शन की, "सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यात युद्ध सुरू, सलमान खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो लॉरेन्सला थेट धमकी देत ​​आहे."

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, सलमान खानचा हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे.

एबीपी न्यूजने हा व्हिडिओ 16 एप्रिल 2020 रोजी आपल्या वेबसाईटवर अपलोड केला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “बॉलिवूडचा 'टायगर' सलमान खान दगडफेक करणाऱ्यांवर संतापला.”

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, कोरोना काळात देशभरात ठिकठिकाणी कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांवर लोकांनी दगडफेक करुन हल्ले केले होते. अधिक महिती येथेयेथे वाचू शकता.

या घटनेचा तीव्र विरोध करत सलमान खानने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन 15 एप्रिल 2020 रोजी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या आणि इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांविरोधात कडक शब्दात संदेश देताना दिसतो.

सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई

सलमान खानवर 1998 मध्ये राजस्थानच्या जोधपूरमध्ये काळवीटची शिकार केल्याचा आरोप होता. अलीकडेच न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी सलमानच्या मुंबईमधील घरावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. अधिक माहिती येथेयेथे वाचू शकता.

व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण ?

काही दिवसांपूर्वी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि सलमान खानचे जवळीक झियाउद्दिन अब्दुल रहीम सिद्दीकी उर्फ बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीनेच स्वीकारली आहे. अधिक महिती येथे वाचू शकता.

याच पार्श्वभूमीव हा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असून अर्धवट आहे. मूळ व्हिडिओमध्ये सलमान खान लॉरेन्स बिष्णोईला धमकी देत नाही, तर कोरोना काळात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या आणि डॉक्टर व पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांवर संतापतो. खोट्या दाव्यासह एडिटेड व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)
Claim :  सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यात युद्ध सुरू. सलमान खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो लॉरेन्सला थेट धमकी देत ​​आहे.
Claimed By :  Social Media User
Fact Check :  FALSE
Tags:    

Similar News