Fact Check : खडकवासला धरण, बंडगार्डन बंधाऱ्याला धोका नाही

Update: 2019-08-07 14:57 GMT

#पुण्यात_हाई_अलर्ट..! सर्व रस्ते आज ४ पासून बंद केले जाणार आहेत..! सर्व कंपनी आणी कॉलेज ला सुट्टी दिली आहे. आपण आपल्या मित्रांना व नातेवाईक मंडळीना पुण्यात येऊ नये म्हणून सांगा.?? बंडगार्डन बंधार्याला तडे गेलेत आणि खडकवासला धरन फुटण्याचे संकेत पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहेत, अशी माहिती Shrikant Shinde यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी

पुण्यातील बंडगार्डन बंधाऱ्याला तडे गेले आहेत का? खडकवासला धरण फुटण्याचे संकेत पुणे पोलिसांनी दिले आहेत का? याची माहिती घेण्यासाठी आम्ही बंडगार्डन बंधाऱ्याला तडे असा शब्दप्रयोग करुन आम्ही शोध घेतला. तेव्हा आम्हाला दैनिक सकाळच्या संकेतस्थळावर खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात खडकवासला पाटबंधारा विभागाचे अधिकारी पांडुरंग शेलार यांनी स्पष्टपणे खडकवासला धरणासह बंडगार्डन बंधारा सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.

सकाळ / Archive

पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के वेंकटेशम यांनी अशा अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. आयुक्त डॉ. के वेंकटेशम यांनी नेमके काय म्हटले आहे, हे आपण खाली वाचू शकता.

निष्कर्ष

पुण्यातील बंडगार्डन बंधारा आणि खडकवासला धरण हे सुरक्षित असल्याचे खडकवासला पाटबंधारा विभागाचे अधिकारी पांडुरंग शेलार यांनी स्पष्ट केले आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के वेंकटेशम यांनी अशा अफवावर विश्वास न ठेवण्याचे आव्हान केले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:Fact Check : Fact Check : खडकवासला धरण, बंडगार्डन बंधाऱ्याला धोका नाही

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False

Tags:    

Similar News