ओडिशामध्ये लोकांद्वारे भाजप नेत्याचा विरोध केल्याचा जुना व्हिडिओ पंजाबचा नावाने व्हायरल 

Update: 2024-04-30 18:31 GMT

जसे जसे निवडणुकीचा एक एक टप्प पार होत आहे. तसे तसे सोशल मीडियावर जुने व्हिडिओ भ्रामक दाव्यासह शेअर केले जात आहेत. अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये काही लोकांकडून वाहनाची तोडफोड करताना दिसतात. दावा केला जात की, पंजाबमध्ये विरोध दर्शवण्यासाठी लोकांनी भाजप नेत्याच्या वाहनाची तोडफोड केली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबद्दल सत्य माहितीची विचारणा केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा असून सध्याच्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित नाही. ही घटना पंजाब नाही तर ओडिशामध्ये घडली होती.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये लोक आवेशात येऊन एका वाहनाची तोडफोड करताना आणि त्यांना रोखताना दिसतात.

Full View

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2 वर्षांपूरवीचा असून पंजाबचा नाही. ही घटला ओडिशामध्ये घडली होती.

कलिंग टीव्हीने हाच व्हिडिओ अपल्या युट्यूब चॅनलवर 12 मार्च 2022 रोजी अपलोड केला होता. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “ओडिशातील लखीमपूर खेरी: चिलिकाचे आमदार प्रशांत जगदेव यांची कार गर्दीवर धावल्याने 20 हून अधिक जखमी.”

https://youtu.be/4uuZe9YV9uU?si=hF4WfMiHLAx-nzom

संपूर्ण घटना

इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार 12 मार्च 2022 रोजी खोडा जिल्ह्यातील बानपूर ब्लॉक ऑफिसमध्ये ब्लॉक अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजप नेते, कार्यकर्ते आणि सामन्य लोक उपस्थित होते.

दरम्यान, भाजप आमदार चिलिकाचे आमदार प्रशांत जगदेव आपल्या एसयूव्हीमध्ये तेथे पोहोचले तेव्हा त्यांनी गर्दीतून आपले वाहन नेले. लोकांनी त्यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेथे वादाचे वातमन निर्माण झाले. पोलिस मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असताना प्रशांत जगदेव यांनी मात्र तेथून पळ काढण्याचा प्रेयत्न करत परत लोकांवर वाहन चढवले.

या दुर्घटनेत या घटनेत 7 पोलिसांसह 22 जण जखमी झाले होते. लोकांनी आवेशात येऊन जगदेव यांच्या वाहनाची तोडफोड केली आणि त्यांना मारहाण केली. हल्ल्यात जखमी झाल्यानंतर प्रशांतला उपचारासाठी भुवनेश्वरला पाठवण्यात आले. तसेच त्यांच्यावर आयपीसीच्या अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला.

एनडीटीव्हीच्या बातमीनुसार रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रशांत जगदेव यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित नाही. 2022 मध्ये ओडिशाच्या खोडा जिल्ह्यात अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान ही घटना घडली होती. भ्रामक दव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:ओडिशामध्ये लोकांद्वारे भाजप नेत्याचा विरोध केल्याचा जुना व्हिडिओ पंजाबचा नावाने व्हायरल 

Written By: Sagar Rawate

Result: False

Tags:    

Similar News