इस्लामिक संस्थेमधील संस्कृत भाषा शिकवतानाचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल

Update: 2023-12-13 16:48 GMT

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक शिक्षक काही मुस्लिम विद्यार्थ्यांना संस्कृत शकवत आहे. दावा केला जात आहे की, या ठिकाणी केरळमध्ये हिंदू मंदिरात मुस्लिम तरुणांना पुजारी पदासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे. या ठिकाणी मुस्लिम विद्यार्थ्यांना केरळमध्ये हिंदू मंदिरात पुजाऱ्यांचे पद मिळण्यासाठी संस्कृत भाष शिकवली जात नव्हती.

काय आहे दावा ?

या व्हिडिओमध्ये एका मुस्लिम संस्थेत विद्यार्थ्यांना संस्कृत शिकताना दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना लिहितात की, “केरळमधील हिंदू मंदिरात मुस्लिम तरुणांना पुजारी म्हणून प्रशिक्षण!”

Full View

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ शरिया एडवांस्ड स्टडीज या इंस्टीट्यूटचा आहे.

इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार गीता व इतर हिंदू ग्रंथ केरळमधील इस्लामिक संस्थेच्या संस्कृत अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. शरिया एडवांस्ड स्टडीज इंस्टीट्यूटने संस्कृत शिकवून आदर्श निर्माण केला आहे. तसेच या संस्थेच म्हणणे आहे की, मुस्लिम विद्यार्थ्यांमध्ये इतर धर्मांबद्दल ज्ञान आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी इथे संस्कृत भाषा शिवली जाते.

इतर प्रसारमाध्यमांनीही ही बातमी प्रसिद्ध केली.

पुढे फॅक्ट क्रेसेंडोने इंस्टीट्यूट ऑफ शरिया आणि अॅडव्हान्स्ड स्टडीजचे प्रचार्य ओनमपिल्ली मुहम्मद फैझी यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, मी व्हायरल व्हिडिओसोबत केलेल्या दव्याचे खंडण करतो. या इंस्टीट्यूटमध्ये हिंदू मंदिरात पुजाऱ्यांचे पद मिळण्यासाठी संस्कृत भाष शिकवली जात नाही. संस्कृत, उपनिषदे, पुराण इत्यादी शिकवण्यामागील आमचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये इतर धर्मांबद्दलचे ज्ञान आणि जागरूकता वाढावी हा आहे. तेसच विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवणे ही आमची स्वतःची शैक्षणिक पार्श्वभूमी होती कारण मी शंकराच्या तत्त्वज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. या ठिकाणी भगवद्गीता, उपनिषदे, महाभारत, रामायण यातील महत्त्वाचे भाग विद्यार्थ्यांना 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर आठ वर्षांच्या कालावधीत निवडकपणे संस्कृतमध्ये शिकवले जातात.”

शरिया महाविद्यालय

इथे उर्दू आणि इंग्रजी सारख्या इतर भाषा देखील कालिकत विद्यापीठाशी संलग्न असल्यामुळे कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शिकवल्या जातात.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. या ठिकाणी मुस्लिम विद्यार्थ्यांना इतर धर्मांबद्दलचे ज्ञान आणि जागरूकता असावी, या हेतूने संस्कृत भाषा शिकवली जाते.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:इस्लामिक संस्थेमधील संस्कृत भाषा शिकवतानाचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Misleading

Tags:    

Similar News