ग्रीसमधील क्रूझ जहाज भरूच-भावनगरमधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Update: 2020-09-29 16:34 GMT

भावनगर ते भरुच रोड हे 350 किलोमीटर अंतर आहे. समुद्री मार्गाने ते 32 किलोमीटर आहे. आता या समुद्री मार्गाने जहाज सेवा सुरू करण्यात आली आहे. एकाच वेळी 600 लोक आणि अवघ्या अर्ध्या तासात हे अंतर पार करणार आहेत. जहाजाची क्षमता 50 ट्रक, 60 बसेस, 200 कार, 350 मोटारसायकली आहे. या माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गुजरातमधील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडो केली आहे.

Full View

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

गुजरातमधील भावनगर ते भरुच रोड जहाज सेवेचा हा व्हिडिओ आहे का, हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओतील एक द्दश्य घेऊन ते रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी हिंदूस्थान टाईम्सने 10 जुलै 2020 रोजी या व्हिडिओसोबत दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार हे ग्रीसमधील जहाज असून करिंथ कालव्यातून जात आहे. ग्रीकची मुख्य भूमी आणि पेलोपोनेशियन द्वीपकल्प दरम्यान जात असलेले हे क्रूझ जहाज आहे. ब्रिटनमधील फ्रेड या कंपनीकडे या जहाजाची मालकी आहे. 

हिंदूस्थान टाईम्स / संग्रहित

ब्रिटनमधील मिरर या वृत्तपत्राच्या संकेतस्थळानेही याच व्हिडिओसोबत 11 ऑक्टोबर 2019 रोजी याबाबतचे वृत्त दिले असल्याचे दिसून येते. या वृत्तातही हे करिंथ कालव्यातून जात असल्याचे क्रूझ जहाज असल्याचे म्हटले आहे.

मिरर / संग्रहित

या जहाजाची मालकी असलेल्या ब्रिटनमधील फ्रेड या कंपनीच्या युटुयूब चॅनलवर आणि ट्विटर खात्यावर 9 ऑक्टोबर 2019 रोजी हा व्हिडिओ अपलोड केला असल्याचे दिसून येते. आपण तो खाली पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=oPkrmTELao8

संग्रहित

https://twitter.com/FredOlsenCruise/status/1181838537039196161?

संग्रहित

निष्कर्ष

गुजरातमधील भावनगर ते भरुच रोड जहाज सेवेचा हा व्हिडिओ असल्याचा दावा असत्य आहे. ग्रीसमधील क्रूझ जहाजाचा हा व्हिडिओ आहे.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:ग्रीसमधील क्रूझ जहाज भरूच-भावनगरमधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False

Tags:    

Similar News