न्यूयॉर्क टाइम्सने नरेंद्र मोदींना उद्देशून "नागडा राजा" असे म्हटले का? वाचा सत्य

Update: 2024-05-06 18:34 GMT

लोकसभा निवडणुकीच्या पर्श्वभूमीवर द न्यूयॉर्क टाइम्सच्या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील एक व्यंग चित्र व्हायरल होत आहे. यामध्ये म्हटले आहे की, भारीतय सुप्रीम कोर्टाने नरेंद्र मोदींना नागडा राजा घोषित केले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या बातमीचे कात्रण आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल वृत्तापत्राचे कात्रण एडिटेड आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल कात्रणमध्ये द न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्राचे कात्रण दिसते. बातमीमध्ये लिहिले होते की, “भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले आहे की, ‘राजा नग्न आहे,’ ("मोदी, ज्याला फेकू देखील म्हटले जाते) भारताच्या मुख्य न्यायमूर्तींच्या दबावाखाली SBI ला भारतातील सर्वात मोठ्या राजकीय माफिया, ऑरेंज कलर्ड ब्लूचा पर्दाफाश करणाऱ्या निवडणूक रोख्यांचा डेटा जाहीर करावा लागला.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम अशी कोणती बातमी द न्यूयॉर्क टाइम्सने दिली असती तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी कोणतीही बातमी माध्यमांमध्यवर आढळली नाही.

तसेच व्हायरल कात्रणमध्ये लिहिण्यात आलेली बातमी द न्यूयॉर्क टाइम्सच्या लेखन शैलीप्रमाणे नाही आणि वृत्तात ही एक ‘व्यंग्य आवृत्ती’ असल्याचे सांगितले आहे.

व्हायरल कात्रण पाहिल्यावर कळाले की, हे कात्रण 15 मार्च 2024 रोजी प्रकाशीत करण्यात आले आहे, असे दिसते.

हा धागा पकडून सर्च केल्यावर कळाले की, द न्यूयॉर्क टाइम्सच्या अधिकृत वेबसाईटने 15 मार्च रोजी प्रकाशीत केलेले वृत आणि व्हायरल कात्रण वेगवेगळे आहे.

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मुळ वृत्तपत्राला एडिट करून खोटी बातमी पसरवली जात आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल बातमी खोटी असून द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तपत्राला एडिट करून खोट्या दाव्यासह बातमी पसरवली जात आहे. खोट्या दाव्यासह बनावट कात्रण व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:न्यूयॉर्क टाइम्सने नरेंद्र मोदींना उद्देशून "नागडा राजा" असे म्हटले का? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Altered

Tags:    

Similar News