एककेचा खरा चेहरा समोर आणेल? काय कंगना लावणार बॉलीवूडकरांची वाट…?
परिचय
भारतीय हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चित्रपटाच्या बाबतीत सध्या अनेक वेगवेगळे प्रयोग होत असतात. प्रेक्षक आणि कलाकार यांच्यामध्ये एक खास नाते कलाकारांच्या कामामुळे तयार होत असते. आजच्या सोशल मिडियाच्या जगात अगदीच ९० च्या दशकाप्रमाणे जरी नंबरवनची स्पर्धा जरी दिसून येत नसली, तरी एखादी व्यक्ती जास्त चर्चेत आली की, त्यावर टीका – टिप्पणी सुरु होतात. सध्या सोशल मिडीयावर चर्चेच्या गोतावळ्यात असणारी एक नायिका कंगना रानौत बद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहेत.
सध्या कंगना रानौत ही, तिच्या मनकर्णिका : क्वीन ऑफ झाशी या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटासाठी तिने दिग्दर्शनही केले आहे. पण काही कलाकार आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील काही लोकांनी कंगनावर टीका करत, तिला बॉलीवूडमध्ये एकटे पडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप कंगनाने केला आहे.
कथन
कंगनाने नुकतेच मुंबई मधील एका गर्ल्स हायस्कूलमध्ये मनकर्णिका चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना तिने बॉलीवूडकारांना खडे बोल सुनावले. जे बॉलीवूड कलाकार आणि इतर लोकं मनकर्णिका चित्रपटाबद्दल नकारात्मक भूमिका घेत बोलत आहेत, आणि मनकर्णिकासाठी तिने केलेल्या दिग्दर्शनबद्दल कंगनाला नावे ठेवत आहेत अशा लोकांना कंगनाने प्रत्यक्ष धमकीच दिली आहे.
कंगनाने बॉलिवूडकरांवर तिच्याविरुध्द षडयंत्र होत असल्याचा आरोप लावला. तिने धमकी दिली की, “बॉलिवूड ज्याप्रकारे माझ्या विरोधात षडयंत्र रचत आहे आणि चुकीच्या गोष्टी करत आहे, अशा लोकांकडे मी दुर्लक्ष करत राहायचे. मग ते सेक्सिजम असो, नेपोटिज्म असो किंवा मग फीसमध्ये असमानता असो. पण आता मी लोकांच्या मागे लागणार आहे आणि त्यांची वाट लावणार आहे. आता मी एकाएकाचा खरा चेहरा समोर आणेल आणि विश्वास ठेवा सर्व अडचणीत सापडतील.” पण कंगनाने यावेळी कुणाचेही नाव घेतले नाही.
तथ्य पडताळणी
अभिनेत्री कंगनाने बॉलिवूडकरांना धमकीवजा बोलल्याचे वृत्त खरे आहे. याबद्दलची सोशल मिडियावर होणारी चर्चा अनेक जण चवीने वाचत आहेत. दरम्यान बॉलिवूडमधील स्टार कलाकार अनुपम खेर यांनी कंगनाच्या कामाचे कौतुक करत, तिला सपोर्ट केला आहे.
Times of India l India Today l
अभिनेत्री आलिया भट हिने मनकर्णिका या चित्रपटाकडे केलेल्या दुर्लक्ष बद्दल कंगनाची माफी मागितली आहे.
त्यानंतरही कंगनाने तिला फोन करत कडक शब्दात समजावले.
DNA India l Pinkvilla l Dailyo l
दरम्यान अभिनेत्री कंगनाने बॉलिवूडकरांवर एवढा राग करण्याची वेळ का आली याचे स्पष्टीकरण थोडक्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
निष्कर्ष :
अभिनेत्री कंगना रानौत हीने बॉलिवूडकरांना धमकीवजा वक्तव्य खरे असून, केवळ जे बॉलिवूड कलाकार, किंव्हा बॉलिवूड इंडस्ट्रीशी निगडीत लोकांनी मनकर्णिका या चित्रपटाबद्दल नकारात्मक भूमिका घेतली आहे अशा लोकांसाठीच हे वक्तव्य कंगनाने केला आहे.
![]() |
Title: काय कंगनाने खरच बॉलीवूडला दिली धमकी?
“ Fact Check By: Amruta Kale Result: Real |
