सत्य पडताळणी: भारताचे समजून घाबरलेल्या पाकने पाडले स्वत:चे विमान

False

पाकिस्तान अतिशय घाबरलेल्या अवस्थेत असून, पाकिस्तानने भारताचे समजून स्वःताचेच विमान पाडले आहे. भारताचे समजून घाबरलेल्या पाकने पाडले स्व:ताचे विमान असे शीर्षक देत दैनिक सकाळच्या संकेतस्थळाने हे वृत्त प्रसारित केले आहे.

सविस्तर वृत्त आपण खाली दिलेल्या लिंकवर वाचू शकता

दैनिक सकाळ / आक्राईव्ह लिंक

दैनिक सकाळने आपल्या फेसबुक पेजवर ही बातमी शेअर केली आहे. या पोस्टला 11 हजार लाईक्स आहेत. दोन हजार 392 जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे. या वृत्तावर 327 जणांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

पाकिस्तान अतिशय घाबरलेल्या अवस्थेत असून, पाकिस्तानने भारताचे समजून स्वत:चेच विमान पाडल्याचे वृत्त  thefauxy.com या संकेतस्थळानेही दिले आहे. दैनिक सकाळने वापरलेले छायाचित्र आणि thefauxy.com ने वापरलेले छायाचित्र समान आहे. या संकेतस्थळाने आपण विनोदी किंवा उपहासात्मक साहित्य निर्मिती करत असल्याचे आणि सत्य वृत्त देत नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

thefauxy.com / आक्राईव्ह लिंक

आम्ही गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोध घेतला असता हे विमान बेल्जियममध्ये ऑक्टोबर 2018 मध्ये पडले असल्याचे आढळून आले.

याबाबतचा एक व्हिडिओ युटूयूबवरही उपलब्ध आहे. या व्हिडिओत 14 व्या सेकंदाला तुम्ही हे छायाचित्र पाहू शकता.

काय आहे सत्य

पाकिस्तानमधील द नेशन या वृत्तपत्राने या घटनेबद्दलचे वृत्त दिले आहे. पाकिस्तानमधील सियालकोट येथे पाकिस्तान हवाई दलाची दोन विमानांनी आवाजाच्या वेगापेक्षा अधिक वेग गाठल्यावर आवाज झाला. भारताला पाकिस्तानची य़ुध्दसज्जता दाखविण्यासाठी हा सराव करण्यात आल्याचे पाकिस्तान हवाई दलाच्या अधिका-यांनी सांगितले आहे.

द नेशन / आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

पाकिस्तानने स्वत:चे विमान पाडलेले नाही. पाकिस्तानने केवळ हवाई दलाच्या दोन विमानांचा सराव केला आहे. पाकिस्तान अतिशय घाबरलेल्या अवस्थेत असून, पाकिस्तानने भारताचे समजून स्वत:चेच विमान पाडल्याचे वृत्त खोटे असल्याचे फॅक्ट क्रिसेडोच्या तथ्य पडताळणीत दिसून आले.

Avatar

Title:सत्य पडताळणी: भारताचे समजून घाबरलेल्या पाकने पाडले स्वत:चे विमान

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False (असत्य)