व्हायरल फोटो उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मजूराचा आहे का ? वाचा सत्य

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

गेले काही दिवसापासून उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यात 41 मजूर अडकले आहे. अद्याप त्या मजूरांना बाहेर का काढण्यात आले नाही ? असा सवाल विचारताना युजर्स एका वृद्ध मजूराचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या मजूराचा नाही. 

काय आहे दावा ?

युजर्स फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “भारत चंद्रावर पोचू शकला नसता तरि चालले असते, पण आपण एका बोगद्यात अडकलेल्या 40 मजूरांपर्यंत 10 – 15 दिवस पोहचू शकत नाही तर…”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, कासेम सुलतानी या व्यक्तीने हा फोटो आपल्या फेसबुक पेजवर 2019 साली शेअर केला होता.

मूळ पोस्ट – फेसबुक 

अर्थात व्हायरल फोटो उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या मजूराचा नाही.

उत्तराखंडमध्ये सध्याची परिस्थिती

हा अपघात दिवाळीच्या दिवशी घडला होता. त्यावेळी हे मजूर उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यात काम करत होते. पण बोगदा पडल्याने हे 41 मजूर 70 मीटर लांबीच्या ढिगाऱ्यापलीकडे अडकून पडले होते.

अडकलेल्या मजूरांशी संपर्क साधण्यासाठी त्या ढिगाऱ्यातून एक पाईप लाईन टाकण्यात आली आणि एका कॅमेऱ्याच्या साह्याने अडकलेल्या मजूरांची पाहाणी करण्यात आली. या ठिकाणी संपर्क साधल्यावर एका अधिकाऱ्याने मजूरांना सांगितले की, “लवकरच तुम्हाला बाहेर काढण्यात येईल. तसेच लवकरच पाईप साफ केल्यावरून तुम्हाला ऑक्सिजन, अन्न आणि औषधे, मोबाईल फोन आणि चार्जर यांसारख्या आवश्यक गोष्टींचा पुरवठा करण्यात येईल.”

काल मंगळवारी या सर्व 41 कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आणि व्ही. के. सिंह यांनी सुटका केलेल्या मजुरांचे स्वागत केले.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुटका केलेल्या मजूरांची फोनवरुन विचारपूस केली.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होत की, व्हायरल होत असलेला फोटो उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या मजूराचा नाही. हा फोटो 2019 पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे. चुकीच्या दाव्यासह असंबंधित फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:व्हायरल फोटो उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मजूराचा आहे का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: Misleading