
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दारू आणि तंबाखू युक्त पदार्थांप्रमाणे समोसा, जिलेबी आणि लाडू यांसारख्या खाद्यपदार्थांवर चेतावणीचे लेबल लावण्याचे निर्देश दिले आहेत, असा दावा करत काही वृत्तसंस्थ आणि माध्यमांनी सोशल मीडियावर ही बातमी शेअर केले आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अशी कोणतीही सूचना दिलेली नाही.
काय आहे दावा ?
लोकमत, न्यूज18 लोकमत आणि जय महाराष्ट्र न्यूज या चॅनल्सनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत बातमी दिली की, “भारतातील लोकांच्या वाढत्या वजनाचा धोका लक्षात घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने समोसा, जिलेबी आणि लाडू यांसारख्या भारतीय पारंपारिक खाद्यपदार्थांवर तेल आणि साखरेचे प्रमाण सांगणारे लेबल लावने बंधन कारक असल्याचे निर्देश दिली आहेत. नागपूरमधील केंद्रीय कार्यालयातील उपहार ग्रहांपासून या मोहीमेची सुरवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.”
मूळ पोस्ट आर्काइव्ह – लोकमत | न्यूज18 लोकमत | जय महाराष्ट्र न्यूज
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल दावा दिशाभूल आहे.
खरतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 21 जून 2025 रोजी भारतीयांच्या वाढत्या वजनाचा धोका लक्षात घेत लोकांना जागृत करण्यासाठी एक शिफारस पत्रक काढले होते.
आरोग्य मंत्रालयाचे हे शिफारस पत्र सर्व विभागांच्या सचिवांना पाठवण्यात आले होते. यामध्ये सर्व विभाग, कार्यालये आणि सरकारी संस्थांना हे उपाय करायला सांगावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
पत्रकात लिहिले होते की, “दैनंदिन अन्नपदार्थांमधील तेल व साखरच्या वाढत्या प्रमाणामुळे मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग इत्यादी आजाराचा धाका निर्माण होण्याची शक्यता असते. लोकांनी आहारात फळे, भाज्या आणि कमी चरबीयुक्त पदार्थांच्या समावेश करावा. नियमित व्यायाम आणि कामाच्या ठिकाणी शारीरिक हलचाल करण्यासाठी पायऱ्यांचा वापर करावा.”
परंतु, या ठिकाणी कुठे ही समोसा, जिलेबी आणि लाडू यांसारख्या खाद्यपदार्थांचा उल्लेख केलेला आढळत नाही.
पुढे पत्रकात खालील प्रमाणे तीन प्रमुख सूचना दिल्या आहेत.
- कामाच्या आणि सार्वजनिक ठिकाणी पदार्थांमधील तेल व साखरेच्या प्रमाणाबद्दल माहिती देणारे पोस्टर किंवा डिजिटल बोर्ड लावावे, जेणेकरून अशे पदार्थ प्रमाणाबाहेर खल्ल्याने होणाऱ्या त्रासासंबंधित लोकांना जागरूक करता येईल.
- सरकारी लेटरहेड, लिफाफे, नोटपॅड, फोल्डरसारख्या कागदोपत्रांवर आरोग्यविषयक संदेश व माहिती छापावी, जेणेकरून लोकांना दररोज लठ्ठपणा टाळण्याची आणि निरोगी राहण्याची आठवण राहील पाहिजे.
- कामाच्या ठिकाणी निरोगी जेवण करणे आणि शरीराची हालचाल होण्यासाठी प्रयत्न करणे. जेवणात फळं, भाज्या, कमी तेलकट पदार्थ , गोड पेय कमी करणे, पायऱ्या वापरण्यास प्रवृत्त करणे, कामामधून वेळोवेळी छोटा ब्रेक घेऊन हलका व्यायाम करणे आणि चालण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणे, अशा गोष्टी प्रोत्साहन द्यावे.
खालील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केले हे पत्रक आपण पीआयबी फॅक्ट-चेकच्या ट्विटर अकाउंटवरदेखील पाहू शकता.
माध्यमांनी व्हायरल दावा सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयने 15 जुलै रोजी पीआयबीद्वारे परिपत्रक जारी करून व्हायरल दाव्याचे खंडण करत सांगितले की, “केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने समोसा, जलेबी आणि लाडू यांसारख्या अन्न उत्पादनांवर चेतावणी लेबल्स लावण्याचे निर्देश दिलेले नाहीत. माध्यमांचे हे वृत्त निराधार, चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत.”
तसेच पीआयबी फॅक्ट-चेकने ट्विट करत व्हायरल दावा खोटा असून लोकांची दिशाभूल करणारा आसल्याचे सांगितले.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने समोसा, जिलेबी आणि लाडू यासारख्या भारतीय पारंपारिक खाद्यपदार्थांवर चेतावणीचे लेबल लावण्याचे निर्देश दिलेले नाहीत. चुकीचा दावा व्हायरल झाल्याने लोकांची दिशाभूल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:सरकारने समोसा, जिलेबी आणि लाडूवर ‘चेतावणी लेबल’ लावण्याचे निर्देश दिलेले नाहीत; वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: Misleading
