
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका फ्लायओव्हर मार्गावरुन जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो.
दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओमधील शिवाजी महाराजांचा पुतळा हा प्रयागराजचा आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, शिवाजी महाराजांचा हा पुतळा छत्रपती संभाजीनगरमधील आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, व्हिडिओमध्ये दिसणारा शिवाजी महाराजांचा पुतळा प्रयागराजचा आहे.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “प्रयागराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह कुंभाची तयारी.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील पुतळा प्रयागराजचा नाही.
रुषिकेश दिवटे नमक एका युजरने 20 डिसेंबर रोजी हाच व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. कॅप्शनमध्ये छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख आढळतो.
मूळ पोस्ट – इंस्टग्राम | आर्काइव्ह
एका युट्यूब चॅनलवर व्हायरल व्हिडिओसारखी एक क्लिप शेअर केली ज्यामध्ये फ्लायओव्हर आणि शिवाजी महाराजांचा तोच पुतळा दिसतो.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “छत्रपती शिवाजी माहाराजांचा हा पुतळा संभाजीनगरमधील (औरंगाबाद) क्रांती चौकात आहे.”
मूळ पोस्ट – युट्यूब | आर्काइव्ह
खालील दिलेल्या गुगल मॅप स्ट्रीट व्ह्यूच्या स्क्रीनशॉटमध्ये आपण तोच फ्लायओव्हर आणि शिवाजी महाराजांचा तोच पुतळा पाहू शकतो.
या पुतळ्याबद्दल अधिक माहिती येथे, येथे व येथे पाहू शकता.
मूळ पोस्ट – गुगल मॅप
पुढे व्हायरल व्हिडिओमधील विद्युत रोषणाई केलेल्या टॉवरचा फोटो रिव्हर्स इमेज द्वारे सर्च केल्यावर कळाले की, प्रयागराजमधील बलसान चौकातले हे टॉवर आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील शिवाजी महाराजांचा पुतळा प्रयागराजमधील नसून छत्रपती संभाजीनगरचा आहे. दोन वेगवेगळे व्हिडिओ एकत्र करुन भ्रामक दाव्यासह शेअर केले जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:शिवाजी महाराजांचा हा पुतळा प्रयागराजमधील नसून छत्रपती संभाजीनगरचा आहे; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Misleading
