
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एका व्यक्तीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, पंतप्रधान मोदींसोबत असलेली व्यक्ती अन्ना हजारे आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमधील व्यक्ती अन्ना हजारे नसून ते लक्ष्मणराव इनामदार आहेत.
काय आहे दावा ?
व्हायरल ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एक व्यक्ती दिसते. फोटोमध्ये लिहिले आहे की, ती व्यक्ती अन्ना हजारे आहेत.
युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “RSS च्या शिबीरातील दुर्मिळ फोटोग्राफ्स.”
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटोमध्ये पंतप्रधान मोदींसोबत असणारी व्यक्ती अन्ना हजारे नाहीत.
द इकोनॉमिक टाइम्सने 22 सप्टेंबर 2017 रोजी हाच फोटो शेअर केला होता. फोटोसोबत लिहिले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असणाऱ्या व्यक्तीचे नाव लक्ष्मणराव इनामदार आहे. त्यांना वकील साहेब म्हणनू ओळखले जाते.
कोण आहेत लक्ष्मणराव इनामदार
लक्ष्मणराव इनामदार हे गुजरातमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सदस्यांपैकी एक होते. नरेंद्र मोदींच्या जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
इनामदारांचे 1984 मध्ये निधन झाल्यानंतर मोदींनी त्यांच्या जीवनावर एक पुस्तकदेखील लिहिले होते. अधिक महिती आपण येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असणारी व्यक्ती अन्ना हजारे नाही. ते लक्ष्मणराव इनामदार आहेत. भ्रामक दाव्यासह हा फोटो व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्ना हजारे संघाच्या शिबिरामध्ये होते का?; वाचा व्हायरल फोटोचे सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: Missing Context
