गेटवे ऑफ इंडियाजवळ धडकलेल्या चक्रीवादळाचा जुना व्हिडिओ सध्याचा म्हणून व्हायरल

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

मुंबईमध्ये लगातार सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याने भरलेली आहेत. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गेट वे ऑफ इंडिया जवळील किनाऱ्यावर लाटा आदळतात आणि परिसर जलमय झालेला दिसतो. दावा केला जात आहे की, “हे दृश्य मुंबईमधील सध्याच्या पावसाचीस्थिती दर्शवतात.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 4 वर्षांपूर्वीचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये गेट वे ऑफ इंडियाजवळ उसळलेल्या लाटा आणि जलमय झालेला परिसर दिसतो. 

न्यूज-18 लोकमतने 19 ऑगस्ट रोजी हाच व्हिडिओ आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “गेट वे ऑफ इंडिया परिसरातलं हे रौद्ररूप पाहिलंत?” 

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2021 वर्षांपासून माध्यमांवर उपलब्ध आहे.

एबीसी न्यूजने हाच व्हिडिओ 19 मे 2021 रोजी ट्विटर पेजवर शेअर केल्याचे आढळले. या व्हिडिओसोबत माहिती दिली होती की, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर तौ’ते चक्रीवादळ सरकत असताना मुंबईचा समुद्रकिनारा आणि गेटवे ऑफ इंडियाचा परिसर पाण्याखाली गेला होता. या वादळाचा वेग 100 मैल प्रतितास होता.

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर इंडियाटुडे, इंडियनएक्सप्रेस आणि न्यूज 18 वृत्त संस्थांनी त्यावेळी याच व्हिडिओचे स्क्रिनशॉट शेअर करत तौ’ते चक्रीवादळाची माहिती दिली होती. यावरुन स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ मे 2021 मध्ये महाराष्ट्रात तौ’ते चक्रीवादळ आदळले तेव्हाचा आहे.

मूळ पोस्ट – इंडियाटुडे

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ 4 वर्षांपूर्वीचा असून मुंबईमधील सध्याची परिस्थिती दर्शवत नाही. 2021 मध्ये मुंबईमध्ये तौ’ते चक्रीवादळ होते तेव्हा गेटवे ऑफ इंडिया जवळील समुद्रकिनाऱ्यावर लाट आदळू लागल्या होत्या. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:गेटवे ऑफ इंडियाजवळ धडकलेल्या चक्रीवादळाचा जुना व्हिडिओ सध्याचा म्हणून व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate  

Result: Misleading


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *