
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसत्ताच्या बातमीचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. या बातमीमध्ये दोन बंधक आणि एक सैनिक दाखवला असून सोबत माहिती दिली की, “आज सकाळी जम्मू काशमीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना गावकऱ्यांनी पकडले आहे.”
दावा केला जात आहे की, पहलगामवरील हल्ल्यानंतर या दोन दहशतवाद्यांना पकडले आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल बातमी 3 वर्षांपूर्वीची आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल बातमीमध्ये दोन्ही दहशतवाद्यांचे फोटो दाखवले आणि मथळामध्ये लिहिले होते की, “मोठी बातमी ! जम्मूमध्ये पकडलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी निघाला भाजपा IT सेलचा प्रमुख.”
युजर्स ही बातमी शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की,“आज सकाळी जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना गावकऱ्यांनी पडकलं आहे. त्यांच्याकडून दारूगोळा आणि एके-४७ बंदुका जप्त करण्यात आल्या. संबंधित दहशतवादी जम्मूच्या रियासी भागात लपून बसले होते, त्यांना गावकन्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. ‘तालिब हुसैन शाह’ असं मुख्य दहशतवाद्याचं नाव आहे, त्याला ९ मे २०२२ रोजी भाजपाने लेटरहेड जारी करत जम्मू विभागाचा भाजपाचा आयटी सेल प्रमुख बनवलं होतं.”
मूळ पोस्ट – इंस्टग्राम | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल बातमी 3 वर्षांपूर्वीची आहे.
लोकसत्ताने हि बातमी 3 जुलै 2022 रोजी फेसबुकवर शेअर केली होती.
लोकसत्ताने बातमीत म्हटले की, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी तालिब हुसैन शाह हा पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी कासिमच्या संपर्कात होता. अलीकडच्या काळात राजौरी जिल्ह्यात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तीन घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. याशिवाय नागरिकांच्या हत्या आणि ग्रेनेड स्फोट घडवण्यात देखील त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भाजपाचे प्रवक्ते आरएस पठानिया यांनी स्पष्टीकरण देत सारवासारव केली की, “ऑनलाइन पद्धतीने सदस्यत्व दिल्याने हा प्रकार घडला आहे. अशाप्रकारे सदस्यत्व देताना संबंधित सदस्याची पार्श्वभूमी तपासली जात नाही, त्याला थेट सदस्यत्व दिलं जातं. त्यामुळे भाजपात कुणीही प्रवेश करू शकतो.” तसेच हे भाजपाविरुद्धचे षडयंत्र असल्याचंही पठानिया म्हणाले. संपूर्ण बातमी येथे वाचू शकता.
मूळ पोस्ट – लोकसत्ता
तसेच इंडिया टूडेनी युट्यूबवर शेअर केलेल्या बातमीनुसार तालिब हुसैन 9 मे 2022 रोजी भाजपमध्ये सामील झाला आणि 27 मे 2022 रोजी त्याने राजीनामा दिला.
दरम्यान, भाजपने म्हटले आहे की, “हा व्यक्ती फक्त 18 दिवस पक्षाचे सदस्य राहिला; त्यामुळे त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध नाही.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल बातमी 3 वर्षांपूर्वीची असून 2022 मध्ये जम्मू काशमीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना गावकऱ्यांनी पडून दिले होते. भ्रामक दाव्यासह पहलगाम हल्ल्याशी जोडून जुनी बातमी शेअर केली जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना पकडल्याची जुनी बातमी पहलगाम हल्ल्याशी जोडून व्हायरल
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Misleading
