कर्नाटक पोलिसांनी गणपतीच्या मूर्तीला जेलबंद केले नव्हते; दिशाभूल करणारा दावा व्हायरल

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

गणेशोत्सवाच्या पाश्वभूमीवर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिस अधिकारी गणपतीच्या मूर्तीला उचलून आपल्या वाहनात ठेवताना दिसतात. दावा केला जात आहे की, “कर्नाटक पोलिसांनी 2024 मध्ये गणपतीच्या मूर्तीला जेलबंद केले होते.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, कर्नाटक पोलिसांनी गणपती मूर्तीला अटक केले नव्हते. त्यांनी मूर्ती ताब्यात घेऊन त्यांचे विसर्जन केले होते.

काय आहे दावा ?

सोशल मीडिया पोस्टमध्ये पोलिस अधिकारी वाहनांमध्ये गणपती मूर्ती ठेवतानाचा फोटो शेअर करून म्हटले की, “हिंदूंचे श्रद्धास्थान काँग्रेसचं टार्गेट ! गणपती बाप्पाला थेट जेलमध्ये टाकणारे कर्नाटकचे पोलीस 2024 ची ही घटना काँग्रेस सरकारचं षडयंत्र. देशात काँग्रेसचे टार्गेट फक्त हिंदूंचे सण आहेत!”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर द टाईम्स ऑफ इंडियाने 14 सप्टेंबर 2024 रोजी प्रकाशित केलेली बातमी आढळली. त्यानुसार, कर्नाटकमधील मंड्या शहरामध्ये गेल्या वर्षी गणपती मिरवणुकीमध्ये दोन गटांमध्ये हिंसक वाद उफाळला होता. 

या प्रकरणाची राष्ट्रीय तपास संस्थेतर्फे (एनआयए) चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी काही आंदोलक बेंगळुरूमधील टाऊन हॉलमध्ये गणेशमूर्ती घेऊन आले होते. 

परंतु, बेंगळुरू शहरतील नियमानुसार आंदोलकांना फक्त फ्रीडम पार्कमध्ये निदर्शने करण्याची परवानगी देण्यात आली होती. 

त्यामुळे विनापरवानगी जमलेल्या या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तत्पूर्वी त्यांच्याकडून गणपती मूर्ती घेत सर्वप्रथम व्हॅनमध्ये ठेवल्या आणि नंतर पोलिस जीपमध्ये नेऊन ठेवल्या.

मूळ पोस्ट – द टाईम्स ऑफ इंडिया | आर्काइव्ह

पुढे अधिक सर्च केल्यावर कळाले की, पत्रकार यासिर मुश्ताक यांनी 14 सप्टेंबर रोजी केलेल्या ट्विटमध्ये घटनेशी संबंधित काही व्हिडिओ शेअर करत व्हायरल दाव्याचे खंडन केले.

पाहिल्या व्हिडिओमध्ये पोलिस आंदोलकांकडून गणपती मूर्ती ताब्यात घेत आहेत, तर दुसऱ्या क्लिपमध्ये पोलिस गणपती मूर्ती जीपमध्ये ठेवताना दिसतात.

व्हिडिओशेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सोशल मीडियावर यूजर्स लिहित आहे की, बेंगळुरू पोलिसांनी गणपतीचा अनादर केला. परंतु, हे पूर्णपणे खोटे आहे. आंदोलक गणेशाची मूर्ती घेऊन आले होते. निषेधकर्त्यांना आंदोलनाची परवानगी नव्हती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी मूर्ती काढून घेतली आणि विसर्जन केले.”

तसेच बेंगळुरूमधील एस.जे पार्क पोलिस स्टेशने 15 रोजी ट्विट करत आंदोलनामधील गणपती मूर्ती विसर्जीत केल्याचे स्पष्ट केले.

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये कर्नाटक पोलिसांनी गणपतीच्या मूर्तीला अटक केली नव्हती. मंड्या शहरामध्ये झालेल्या हिंसाचाराविरोधत परवानगी शिवाय आंदोलन करत होते. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना अटक केले आणि गणपतीची मूर्ती ताब्यात घेऊन त्याचे विसर्जन केले.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:कर्नाटक पोलिसांनी गणपतीच्या मूर्तीला जेलबंद केले नव्हते; दिशाभूल करणारा दावा व्हायरल

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: Misleading


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *