चीनमधील जगातील सर्वात मोठा पूल म्हणून दुसऱ्याच या पर्यटनस्थळाचा फोटो व्हायरल 

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

चीनमधील दानयांग-कुन्शान ग्रँड ब्रिज या पुलाची लांबी 164 किलोमीटर असून हा जगातील सर्वात लांब पूल म्हणून ओळखला जातो. याच पार्श्वभूमीवर एक रस्त्यालगत असलेल्या इमारतींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा चीनमधील दानयांग-कुन्शान ग्रँड ब्रिज आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो दानयांग-कुन्शान ग्रँड ब्रिजचा नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये दोन बाजूंचा रस्ता आणि त्याला लगत काही इमारती दिसतात.

फोटोसोबत ग्राफिक मध्ये लिहिले होते की, “चीनमध्ये असा एक पूल आहे (Danyang-kunshan Grand Bridge) जो तब्बल 164 किलोमीटर लांब आहे – हा जगातील सर्वात मोठा पूल आहे.”

युजर फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “चीनमध्ये असा एक पूल आहे जो तब्बल 164 किलोमीटर लांब आहे – हा जगातील सर्वात मोठा पूल आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटोमध्ये दाखवलेले ठिकाण  दानयांग-कुन्शान ग्रँड ब्रिज नाही.

पेक्सेल्स नामक स्टॉक इमेज वेबसाईटवर हाच फोटो आढळला. फोटोसोबत दिलेल्या महितीनुसार ही चीनमधील चोंगकिंग येथील होंगयाडोंग हिलसाइड येथील एक तपकिरी इमारत आहे. या इमारतीसंबंधित अधिक माहिती येथेयेथे वाचू शकता.

हा धागा पकडून गुगल मॅपवर सर्च केल्यावर आम्हाला चीनमधील चोंगकिंग येथील होंगयाडोंग हिलसाइड येथे व्हायरल इमारत आढळली.

पुढे सर्च केल्यावर कळाले की, दानयांग-कुन्शान ग्रँड ब्रिज हा बीजिंग-शांघाय हाय-स्पीड रेल्वेवरील 164.8 किमी लांबीचा जगातील सर्वात लांब पूल आहे. अधिक महिती येथे, व  येथे वाचू शकता.

खालील मॅपचा स्क्रिनशॉट पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, हा पूल दान्यांग (नानजिंगच्या उत्तरेस) जवळून सुरू होऊन चांगझोऊ, वूशी, सुझोऊमधून पूर्वेकडे जाते आणि शांघायच्या पश्चिमेस असलेल्या कुन्शान येथे संपतो. 

दोन्ही ठिकाणातील अंतर ?

गुगल मॅपवर दोन्ही ठिकाणाची तुलना केल्यावर चोंगकिंग आणि दानयांग-कुन्शान ग्रँड ब्रिजमधील रस्त्याने प्रवासाचे अंतर सुमारे 1,605 किमी आहे.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटो दानयांग-कुन्शान पुलाचा नाही. मुळात हा फोटो चीनमधील चोंगकिंग हाँगयाडोंग (वायव्य गेट) या पर्यटन स्थळाचा आहे. या दोन्ही ठिकाणामधील अंतर हजारो किलोमीटर आहे. भ्रामक दाव्यासह हा फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:चीनमधील जगातील सर्वात मोठा पूल म्हणून दुसऱ्याच या पर्यटनस्थळाचा फोटो व्हायरल 

Written By: Sagar Rawate  

Result: Misleading


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *