
पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकारसोबत अनेक सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. याच पार्श्वभूमीवर एक दावा व्हायरल होत आहे की, “माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यांनी पांजाबमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी 42 कोटींचे 600 ट्रॅक्टर्स पाठवण्याची घोषणा केल्यानंतर ईडीने त्यांना समन्स पाठवले.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा दिशाभूल करणारा असून युवराज सिंग यांनी 600 ट्रॅक्टर पाठविण्याची घोषणा केलेली नाही. तसेच ईडीने (सक्तवसुली संचालन) ऑनलाईन बेटिंग अॅप प्रकरणात चौकशीसाठी युवराजला नोटीस बजावली आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल पोस्टमध्ये युवराज सिंगचा फोटो शेअर करत युजर्स लिहितात की, “माजी क्रिकेटर युवराज सिंहला इडी कडुन समन्स. पांजाबमधील पूरग्रस्तांना 42 कोटींचे 600 ट्रॅक्टर मदत म्हणुन घोषित केल्यानंतर समन्स.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, युवराज सिंगने पंजाबमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी 42 कोटींचे 600 ट्रॅक्टर्स पाठवण्याची घोषणा केलेली नाही. तसेच ईडीने युवराजला वेगळ्या कारणासाठी समन्स पाठवले आहे.
न्यूज-18 मराठी, महाराष्ट्र टाइम्स, एबीपी माझा, प्रहार, टाइम्स ऑफ इंडिया आणि इतर न्यूज संस्थांनी 16 सप्टेंबर रोजी शेअर केलेल्या बातमीनुसार, माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अॅप वन एक्स बेट (1xBet) प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे. युवराजला 23 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या ईडी मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा आणि अभिनेता सोनू सूद यांनादेखील ईडीने समन्स पाठवले आहे.

मूळ पोस्ट – टाइम्स ऑफ इंडिया
युवराजने अशी घोषणा केली का ?
कीव्हर्ड सर्च केल्यावर युवराज सिंगने पंजाबमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी 600 ट्रॅक्टर्स पाठल्याची कोणतीही बातमी आढळत नाही.
तसेच युवराज सिंगचे अधिकृत फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट तपासल्यावर अशी कोणतीही घोषणा केल्याचे आढळले नाही.
खंडण
अधिक महितीसाठी फॅक्ट क्रेसेंडोने युवराज सिंगशी संलग्नित YouWeCan फाउंडेशनशी संपर्क साधला. संस्थेतर्फे स्पष्ट करण्यात आले की, “व्हायरल बातमी दिशाभूल करणारी असून युवराज सिंग यांनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. मुळात युवराज सिंगला बेकायदेशीर बेटिंग अॅप प्रकरणी ईडीने समन्स बजावले आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:युवराज सिंगने पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी 600 ट्रॅक्टर्स पाठवले म्हणून ईडीने समन्स बजावले का ? वाचा सत्य
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Misleading
