
सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, बिहारच्या अवनिश कुमार नावाच्या तरुणाने केवळ आठ दिवसांत आणि अवघ्या सात हजार रुपयांच्या खर्चात विमान तयार केले. सोबत एका तरुणाचा विमान आकाश झेप घेताचा व्हिडिओदेखील शेअर केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ बिहारचा नसून बांगलादेशमधील आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती छोटे विमान उडवताना दिसतो.
हाच व्हिडिओ लोकमतने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “बिहारच्या अवनीश कुमार या किशोरवयीन तरुणाने केवळ आठ दिवसांत आणि अवघ्या 7,000 रुपयांच्या खर्चात एक विमान तयार करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे हे विमान त्याने भंगारातील साहित्य वापरून तयार केले आहे.”
मूळ पोस्ट – फेसबुक | फेसबुक | फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ बिहारचा नाही.
कृष्ण टीव्ही नामक फेसबुक पेजने हाच व्हिडिओ 9 मार्च 2025 रोजी शेअर केल्याचे आढळले. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “हजारो लोकांच्या समोर शेतकऱ्याच्या मुलाचे जुल्हासचे विमान पुन्हा आकाशात झेपावले.”
तसेच कॅप्शनमध्ये “माणिकगंज मुलगा जुल्हासचे विमान” असे हॅशटॅग वापरले.
https://www.facebook.com/share/r/16MghfmMAK
सदरील महितीच्या आधारे अधिक सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये विमान उडविणाऱ्या तरुणाचे नाव जुल्हास मोल्ला असून तो इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आहे. तसेच जुल्हास हा बांगलादेशीतील माणिकगंजच्या शिबालया उपजिल्ह्यातील शैतागर तेओटा या गावचा रहिवासी आहे.
जुल्हासने 4 मार्च 2025 रोजी यमुना नदीच्या काठावरील जाफरगंज येथे यशस्वीरित्या विमान उडवले आणि सुरक्षितरित्या जमिनीवर उतरवले होते. हे पाहण्यासाठी लोकांनी मोठी केली होती.
या विमानाचे वजन 100 किलोपेक्षा जास्त असून हे बनवण्यासाठी स्टेनलेस स्टील, अल्युमिनियम आणि लोखंडाचा करण्यात आला आहे. तसेच यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर आणि सात-अश्वशक्तीचे वॉटर पंप इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे विमान बनवण्यासाठी 8 लाख रुपयांचा खर्च आलेला आहे. अधिक महिती येथे व येथे वाचू शकता.
ढाका ट्रिब्यून, बंगला ट्रिब्यून आणि एटीएन बांगला न्यूजसह सारख्या अनेक माध्यमांनी आपल्या युट्यूब चॅनलवर जुल्हास विमान उडवतानाचा व्हिडिओ शेअर करत बातमी दिली.
तसेच जुल्हास मोल्लाने “क्रिएट बाय जुल्हास” या आपल्या युट्यूब चॅनलवर विमान बनवण्यापासून ते उडवण्यापर्यंतच्या प्रवासाचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत.
मूळ पोस्ट – युट्यूब
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ बिहारचा नाही. बांगलादेशातील माणिकगंज गावातील जुल्हास मोल्ला नामक इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकने हे विमान 4 वर्षात बनवले असून त्यासाठी आठ लाख रुपयांचा खर्च लागला. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:तरुणाने विमान तयार केल्याचा तो व्हिडिओ बांगलादेशचा आहे; तो बिहारी असल्याचा दावा फेक
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Misleading
