बांगलादेशमधील हिंसाचाराने सर्व जागाचे लक्ष वेधलेले आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक असंबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

खालील सर्व व्हिडिओंची पडताळणी केल्यावर कळाले की, हे व्हिडिओ भ्रामक दाव्यासह शेअर केला जात आहेत.

व्हिडिओ क्र. 1

व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक मृतदेह रस्त्यावर पडलेले दिसतात.

दावा – बांगलादेशातील मुस्लिमांनी हिंदू छावणीवर बॉम्बने हल्ला केला.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

सत्य –

ही घटना 7 जुलै रोजी बांगलादेशच्या बोगुरा शहरातील सेजगरी आमटली चौकात घडली होती. रथयात्रेदरम्यान रथ विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने पाच जणांचा मृत्यू तर 40 हून अधिक जण जखमी झाले होते. या ठिकाणी बॉम्ब हल्ला झाला नव्हता.

मूळ बातमी – दैनिक पुर्बोकोण

व्हिडिओ क्र. 2

या व्हिडिओमध्ये एक महिला मेगाफोन स्पीकरद्वारे बंगालीमध्ये भाषण करताना आणि रडताना दिसते.

दावा – बांगलादेशातील हिंदू महिलांना इस्लाम स्वीकारण्यास किंवा बांगलादेश सोडण्यास भाग पाडले जात आहे. ज्याला ही हिंदू महिला कडाडून विरोध करत आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

सत्य –

व्हिडिओत दिसणारी महिला बांगलादेशी अभिनेत्री अजमेरी हक बधोन आहे. बांगलादेशमध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात एकता दाखवण्यासाठी अनेक कलाकारांनी 1 ऑगस्ट राजधानी ढाकामधील फार्मगेटवर निदर्शने केली होती. अधिक महिती येथे वाचू शकता.

https://youtu.be/gidRGVnKPqM

व्हिडिओ क्र. 3

या व्हिडिओमध्ये काही लोकांनी पत्रकारांशी गैरवर्तन करताना दिसतात.

दावा – बांगलादेशात वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराशी आंदोलकांनी गैरवर्तन केले.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

सत्य – हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. न्यूयॉर्कमधील आंदोलकांनी 1 जून 2020 रोजी बांगलादेशातील समय टेलिव्हिजनचे प्रतिनिधी हसनझ्झमन साकी यांच्याशी गैरवर्तन केले होते.

मूळ बातमी – द बिझनेस स्टैंडर्ड

व्हिडिओ क्र. 4

या व्हिडिओमध्ये रस्त्यावर बसलेल्या काही तरुणांभोवती काही लोक काठ्या घेऊन उभे असलेले दिसतात.

दावा – “बांगलादेशमध्ये हिंदू लोकांना बंधक बनवून जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतरित केले जात आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

सत्य –

हा व्हिडिओ 16 जुलै रोजी बांगलादेशच्या बसुंधरा गेटसमोरील आहे. या दिवशी बांगलादेशमधील विविध खासगी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी बीसीएल हल्ला आणि कोटा पद्धतीवर तार्किक तोडगा काढण्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने केली होती.

बसुंधरा गेटसमोर आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांची नमाजाची वेळ झाल्यावर त्यांनी रसत्यावरच नमाज अदा केली. तसेच शेजारी उभ्या असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन सुरूच ठेवले.

मूळ बातमी – बांगलादेश मुमेंट्स

व्हिडिओ क्र. 5

या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला जमावाकडून मारहाण होताना दिसते.

दावा – बांगलादेशात हिंदूंविरुद्ध सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

सत्य – ही घटना 5 ऑगस्ट रोजी घडली होती. बांगलादेशमधील झेनाइदह सदर उपजिल्हाच्या अवामी लीगचे सरचिटणीस आणि स्थानिक नगरपरिषद पोराहाटी युनियनचे अध्यक्ष शाहिदुल इस्लाम हिरान यांना लोकांनी फाशी दिली होती. अर्थात व्हिडिओमध्ये मारली गेलेली व्यक्ती हिंदू नव्हती.

मूळ बातमी – कॉर्पोरेट संगबाद

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेले व्हिडिओ बांगलादेशामधील सांप्रदायिक हिंसाचार दर्शवत नाही. भ्रामक दाव्यासह असंबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:बांगलादेशमधील सांप्रदायिक हिंसाचार म्हणून अनेक असंबंधित व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: False