सध्याच्या निवडणुकीच्या काळात अनेक बनावट व्हिडिओ भ्रामक दाव्यासह सोशल मीडियावर शेअर केले जातात. अशाच एका प्रकारच्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणतात की, “ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आहे. एका बाजूला काँग्रेस आणि इंडिया आघाडी लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसऱ्या बाजूला लोकशाही आणि संविधान वाचवणारे भाजप आणि आरएसएस आहेत. काँग्रेसने 22-25 लोकांना अब्जाधीश बनवले, नरेंद्र मोदी करोडो महिला आणि तरुणांना करोडपती बनवणार आहेत.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

शेवटी राहुल गांधी भाजप आणि आरएसएसला पाठिंबा देण्यास सांगतात आणि पंतप्रधान मोदींना मतदान करण्याचे आवाहन करतात.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. मुळात राहुल गांधी काँग्रसला समर्थन आणि मतदान करणयास सांगत होते.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी भाजप व आरएसएसला समर्थन आणि मतदान देण्याचे आवाहन करताना दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करतान कॅप्शनमध्ये लिहितात की, “राहुल गांधी यांच्या कडून खूप महत्वाचे आणि शेवटचे आवाहन.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम राहुल गांधींनी असे कोणते आवाहन केले असते तर ही एक मोठी बातमी ठरली असती. परंतु, कोणत्याही अधिकृत माध्यामांवर राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसला समर्थन दाखवल नरेंद्र मोदींना मतदान करण्याच्ये नागरिकांना आवाहन केले, अशी बातमी आढळली नाही.

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे.

राहुल गांधींनी 25 एप्रिल रोजी आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवरून मुळ व्हिडिओ शेअर केले होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “लोकशाहीचे कर्तव्य पार पाडा, काँग्रेससोबत या, हाथच्या चिन्हाचे बटण दाबा!”

https://youtube.com/shorts/rxtxNT9Qdcg?si=B8_U_foHrMjXmXib

वरील व्हिडिओमध्ये राहुल गांधी कुठेच भाजप आणि आरएसएसला समर्थन देताना किंवा त्यांना मत देण्यासाठी अपील करताना दिसत नाही.

या व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणतात की, “एका बाजूला भाजप आणि आरएसएस लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि इंडिया आघाडी लोकशाही आणि संविधान वाचवत आहे. कण्याकुमारी पासून कश्मीर पर्यंत आम्ही चार हजार किलोमीटर पाई चाललो. मनिपूर पासून महाराष्ट्र चाललो. आपल्याशी चर्चा करून, आपल्या मनातील गोष्टी जानून घेऊन आम्ही क्रांतीकारी घोषणापत्र तयार केले आहे. हे घोषणापत्र काँग्रेसने तयार केले असले तरी ते आपले घोषणापत्र आहे. त्यामध्ये पाच आश्वासन दिली आहेत की, नरेंद्र मोदींनी 22-25 लोकांना अब्जाधीश बनवले. आम्ही महिला आणि तरुणांना करोडपती बनवणार आहोत. शेतकऱ्यांना एमएसपी (किमान आधारभूत किंमत) देणार आणि त्यांचे कर्ज माफ करणार आहोत. मजुरांना 400 रुपयांचे किमान वेतन देणार आहोत. हा देशाला बदणारा घोषणापत्र आहे.”

तसेच व्हिडिओच्या शेवटच्या भागात ते काँग्रसेला समर्थन करण्यासाठी आणि पज्या चिन्हाचे बटण दाबण्याची विनंती करतात.

हेच वक्तव्य असलेला व्हिडिओ इंडियन एक्सप्रेस आणि प्रेस गॅलरी नामक युट्यूब चॅनलनेदेखील अपलोड केले आहे.

खालील तुनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्यालक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून शब्दांची फेरफरा केली आहे, जेने करून राहुल गांधी भाजपचे समर्थन करत आहेत. असे दिसते.

https://youtu.be/spGbWfXx6HU

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. मुळात राहुल गांधी काँग्रेसचे समर्थन करत नागरिकांना पंज्याचे बटण दाबण्याची विनंती करत होते. खोट्या दाव्यासह हा बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:राहुल गांधींनी नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करण्याचे आवाहन केले नाही; बनावट व्हिडिओ व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Altered