या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पा संदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते बजेटवर आपली प्रतिक्रिया देताना फक्त छान बजेट, बेस्ट बजेट असंच बोलतात.

व्हिडिओसोबत असा दावा केला जात आहे की, 2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर रामदास आठवले यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा हा व्हिडिओ आहे.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. मुळात हा व्हिडिओ 2019 मधील आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये अर्थसंकल्पवर प्रश्न विचारल्यावर रामदास आठवले फक्त ‘छान बजेट’, ‘बेस्ट बजेट’ म्हणताना दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “ज्यांना 23/07/2024 चे बजेट नाही कळले त्या लोकांसाठी अतिशय सोप्या शब्दात.. रामदास आठवले नी समजुन सांगितले.”

मुळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड असून मुळ व्हिडिओ अर्थसंकल्प 2019 च्या संदर्भातला आहे.

संसद टीव्हीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर 1 फेब्रुवारी 2019 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता.

या व्हिडिओमध्ये सुरुवातीला पत्रकार रामदास आठवलेंना पियुष गोयल यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावर त्यांची प्रतिक्रिया विचारते.

प्रतिक्रिया देताना आठवलेंनी अर्थसंकल्पाचे कौतुक करताना ‘बजेट’ हा शब्द अनेकवेळा उच्चारला.

परंतु, व्हायरल व्हिडिओत जितक्या वेळा दिसत आहे, तितक्या वेळा त्यांनी तो शब्द उच्चारला नाही.

https://youtu.be/AR6IREu8iQo

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून रामदास आठवलेंना छान बजेट, बेस्ट बजेट इतकच म्हणताना दाखवले आहे.

https://youtu.be/-8e8r5wqACQ

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ जुना व एडिटेड आहे. मुळात रामदास आठवले यांनी 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली होती. भ्रामक दाव्यासह एडिटेड व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:रामदास आठवलेंचा जुना व्हिडीओ एडिट करून सध्याच्या अर्थसंकल्पशी जोडून व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate

Result: Altered