सोशल मीडियावर महिला बुरखा घतलेल्या महिलांच्या गर्दीचा व्हिडिओ शेअर करत दावा केला जात आहे की, सलग तिसऱ्यांदा सादिक खान यांनी लंडनच्या महापौरपद जिंकल्यानंतर जल्लोष साजरा करतानाची ही गर्दी आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2021 मध्ये झालेल्या अशुरा जुलूसचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये बुरखा घतलेल्या महिला रस्त्यावरून जात आहेत.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हे आजचे लंडन आहे; सलग तिसऱ्यांदा लंडनच्या महापौरपदी सादिक खान यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करत असलेली गर्दी.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स ईमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2021 पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

मिशन 313 हेल्प द हेल्पलेस नावाच्या फेसबुक पेजने हाच व्हिडिओ 17 सप्टेंबर 2021 रोजी अपलोड केला होता. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “हा व्हिडिओ 2021 मध्ये लंडन ‘आशुरा जुलूस’चा आहे. महिलांनी हिजाब पाळला आणि सयदा झैनब सा यांच्या सन्मानार्थ ‘जुलूस ए आझा’ संबंधित सभ्यता राखली, हे खरोखर कौतुकास्पद आहे.”

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, हा जुलूस द हुसैनी असोसिएशन संघटनेने आयोजित केला होते. या संघटनेने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून 16 ऑगस्ट 2021 रोजी ‘आशुरा जुलूस’चे आमंत्रन आणि जुलूसचा मार्ग दर्शवणारे मॅप अपलोड केले होते.

आर्काइव्ह

सदरील निमंत्रणामध्ये ‘ऑक्सफर्ड स्ट्रीट’ हे स्थान दर्शवले आहे. तसेच व्हायरल व्हिडिओमध्ये दिखील रस्यावरील 'ऑक्सफर्ड स्ट्रीट डिस्ट्रिक्ट' असे लिहिलेले निळे बॅनर दिसते.

हा धागा पकडून गुगल मॅप सर्च केल्यावर 2021 जुन मध्ये ऑक्सफर्ड स्ट्रीटवर याच निळ्या रंगाच्या बॅनर दिसते, सोबत इतर ही बॅनर दिसतात.

मूळ पोस्ट – गुगल मॅप

लंडनचा महापौर निवडण्यासाठी 2 मे 2024 रोजी निवडणूक घेण्यात आली होती, ज्यामध्ये सादिक खान यांनी 43.8% मतांसह महापौर म्हणून तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

https://youtu.be/e6n6L-te7M4?si=H4MZmysUVCLMGGKF

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, बुर्खा घातलेल्या महिलांच्या जल्लोषाचा व्हिडिओ सादिक खान तिसऱ्यांदा लंडनचे महापौर झाल्यानिमित्त काढलेल्या मिरवणुकीचा नाही. हा व्हिडिओ 2021 साली लंडनमध्ये झालेल्या ‘आशुरा जुलूस’चा आहे.

Avatar

Title:सादिक खान लंडनचे महापौर झाल्यावर बुर्खाधारी महिलांनी जल्लोष केला का? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading