मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आशिष शेलार एका मुस्लिम व्यक्तीच्या हातून खजूर खाताना दिसतात.

दावा केला जात आहे की, फोटोमध्ये आशिष शेलार सोबत दिसणारा व्यक्ती दहशदवादी याकुब मेमनचा भाऊ आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमध्ये आमदार आशिष शेलार यांच्या सोबत भाजप नेते हैदर आझम आहेत.

काय आहे दावा ?

या फोटोमध्ये आशिष शेलार एका मुस्लिम व्यक्ती सोबत दिसते. फोटोच्या ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “आशिष शेलार यांना हिंदुत्वाचा घास भरवताना याकूब मेमनचा भाऊ.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो दोन वर्षांपूर्वीचा असून आशिष शेलार सोबत दिसणारी व्यक्ती दहशदवादी याकुब मेमनचा भाऊ नाही.

काजीम देशमुख नामक युजरने हाच फोटो 11 सप्टेंबर 2022 रोजी शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “या फोटोत आशिष शेलारांसोबत असणारे गृहस्थ याकूब मेमनचे बंधू नसून महाराष्ट्र भाजप सचिव हैदर आझम आहेत.”

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, भाजप नेते हैदर आझम यांनी हाच फोटो 15 एप्रिल 2022 रोजी इंस्टाग्रामवर शेअर केला होता.”

फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “माझे भाऊ वकील आशिष शेलार जी यांना माझ्या घरी इफ्तारसाठी पाहुणचार करताना आनंद झाला!”

मूळ पोस्ट – इंस्टग्राम | आर्काइव्ह

आशिष शेलारांचे खंडन

हाच फोटो रौफ मेमन म्हणून व्हायरल झाल्यावर आमदार आशिष शेलार यांनी 12 सप्टेंबर 2022 रोजी ट्विट करत व्हायरल दाव्याचे केले की, “जुनेपुराणे संदर्भहिन फोटो शोधून समाज माध्यमात जी माझी बदनामी करीत आहे, त्या विरोधात हैदर आझम यांनी एफआयआर दाखल केलाय.”

आशिष शेलार यांनी व्हायरल फोटो प्रकरणी आणखी एक ट्विट करत दिव्यमराठीची बातमी शेअर केली. ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “आदित्य ठाकरेंच्या निकटच्या चार जणांवर गुन्हा दाखल: पेंग्विन सेना माझी बदनामी करीत आहे.”

दिव्यमराठी

दिव्यमराठीच्या बातमीनुसार खोट्या दाव्यासह फोटो व्हायरल करणारे आरोपी युवासेनेशी संबंधित असून ते सर्व आदित्य ठाकरेंच्या निकट असल्याचे बोलले जात होते. अधिक महिती येथे वाचू शकता.

मूळ पोस्ट – दिव्यमराठी | आर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटोमध्ये आमदार आशिष शेलार यांच्या सोबत दहशदवादी याकुब मेमनचा भाऊ नसून भाजप नेते हैदर आझम आहेत. खोट्या दाव्यासह हा फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Claim Review :   आशिष शेलार यांना हिंदुत्वाचा घास भरवताना याकूब मेमनचा भाऊ.
Claimed By :  Social Media User
Fact Check :  MISLEADING