निवडणुकीच्या काळात नेत्यांचे अनेक एडिटेड व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल होतात. अशाच एका व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणतात की, “4 जुननंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील.”

राहुल गांधी विरोधीपक्षात असूनदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असे म्हणाले, या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ एडिटेड आहे. मुळात राहुल गांधी म्हणाले की, “नरेंद्र मोदी 4 जुननंतर पंतप्रधान राहणार नाहीत.”

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी भाषणादरम्यान म्हणतात की, “4 जुननंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील.” हेच वक्तव्य व्हिडिओमध्ये हिंदीत लिहिलेले दिसते.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “राहुल गांधी यांनी शेवटी घोषित करून टाकले.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम राहुल गांधींनी असे कोणते वक्तव्य केले असे तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी कोणतीही अधिकृत माहिती माध्यमावर आढळली नाही.

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, राहुल गांधींनी 10 मे रोजी उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरार केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ आहे.

https://www.youtube.com/live/dRFCoSglpkU?si=BenyyluPvwWNJh3h&t=2751

वरील भाषणात राहुल गांधी 45:53 मिनिटांपासून पुढे म्हणतात की, “भारतातील माध्यमे आपल्याला जी गोष्ट सांगणार नाही ती सुरूवातीला मी तुम्हाला सांगु इच्छीतो की, “4 जुन 2024 पासून नरेंद्र मोदी भारताचे पंप्रधान राहणार नाही.

सदरील वक्तव्य आपण येथे पाहू शकतात.

तसेच काँग्रसच्या अधिकृत वेबसाईटवर हे संपूर्ण भाषण उपलब्ध आहे.

एडिटेड व्हिडिओ व्हायरल झाल्यावर राहुल गांधींनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सांगितले की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड असून मी पुन्हा एकदा सांगत आहे – “नरेंद्र मोदी 4 जूननंतर पंतप्रधान राहणार नाहीत.”

मूळ पोस्ट – ट्विटर

काँग्रस आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शेअर केलेला तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून ‘नाही’ हा शब्द हटवण्यात आला आहे.

https://twitter.com/INCIndia/status/1790659544391000113

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. मुळात राहुल गांधी म्हणाले की, “नरेंद्र मोदी 4 जुननंतर पंतप्रधान राहणार नाही.” खोट्या दाव्यासह एडिटेड व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असे राहुल गांधी म्हणाले का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Altered