काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. ज्यामध्ये राहुल गांधी भाषणादरम्यान 50 आणि 15 ची बेरीज 73 सांगतात. जे की चुकीच उत्तर आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सोशल मीडियावर यूजर्स राहुल गांधींची खिल्ली उडवत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. मूळ व्हिडिओमध्ये राहुल गांधी 50, 15 आणि 8 ची बेरीज 73 सांगतात. जे की बरोबर उत्तर आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओ शेअर करतान युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “50 + 15 = 73 महान गणितज्ञ राहुल गांधी.”

मूळ व्हिडिओ – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ क्लिप राहुल गांधी 8 फेब्रुवारी 2023 रोजी छत्तीसगडमधील रायगडमध्ये भारत जोडो न्याय यात्रेच्या प्रवेशादरम्यान आयोजित जाहीर सभेत केलेल्या भाषणची आहे.

राहुल गांधी यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवरुन या भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

https://youtu.be/cPrJLMPHXbQ

संपूर्ण भाषण पाहिल्यावर 19 मिनिट 50 सेकंदावर आपण व्हायरल क्लिपमधील भाग पाहू शकतो. राहुल गांधी देशातील जात जनगणनेचा उल्लेख करताना म्हणतात की, “एका पत्रकाराने मला विचारले की, “तुम्ही प्रत्येक भाषणात जातीच्या जनगणनेबद्दल आणि मागासवर्गीयांच्या हक्काबाबत बोलतात. परंतु, यामुळे देशाचे विभाजन होईल असे तुम्हाला वाटत नाही का ?” ज्यावर मी (राहुल गांधी) त्यांना आणखी एक प्रश्न विचारला की, या पत्रकार परिषदेला अनेक पत्रकार आणि कॅमेरामन आले आहेत. ही संपूर्ण यंत्रणा असून या व्यवस्थेत किती आदिवासी आणि मागासलेले लोक आहेत? यावर तो पत्रकार गप्प बसला.”

पुढे राहुल गांधी भाषणात म्हणतात की, देशाचा किमान 50% भाग मागासलेला आहे. हे कोणालाच माहीत नाही कारण नरेंद्र मोदींनी 2011 मध्ये जे आकडे आम्ही तयार केले होते ते सार्वजनिक केले नाहीत. मात्र 50 - 55 टक्के लोक मागासवर्गीय असल्याचे सांगितले जाते. 15% दलित आणि 8% आदिवासी आहेत.”

पुढे ते जनतेला प्रश्न विचारतात की, " मला सांगा 50 + 15 + 8 किती झाले ? 73."

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे.

https://youtu.be/DJDXoTQTwMg

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. मूळ व्हिडिओमध्ये राहुल गांधी 50, 15 आणि 8 ची बेरीज 73 सांगतात. जे की बरोबर उत्तर आहे. चुकीच्या दाव्यासह बनावट व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:राहुल गांधींनी 50 आणि 15 ची बेरीज 73 सांगितली का? एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Altered