आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत.

या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रस पक्षाने गेले 75 वर्ष देशाला लुटले, असे उद्धव ठाकरे बोलतात.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ बनावट आहे. मुळात उद्धव ठाकरे काँग्रेस नव्हेतर भाजपवर टीका करत होते.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की, “ गेले 75 वर्ष काँग्रेसने देशाला लुटल आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह | इंस्टग्राम | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ क्लिप 3 मार्च रोजी धारावीमध्ये संयुक्त समाजवादी संमेलनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणची आहे.

झी 24 तास न्यूजने आपल्या युट्यूब चॅनलवर या भाषणाचा संपूण व्हिडिओ अपलोड केला आहे.

https://youtu.be/_BX4U4KWnI4?si=SoSsemRADdIp2Vpg&t=692

संपूर्ण भाषण पाहिल्यावर 11 मिनिट 32 सेकंदावर आपण व्हायरल क्लिपमधील भाग पाहू शकता. यानंतर उद्धव ठाकरे म्हणतात की, “गेल्या 75 वर्षांत काँग्रेसने देशाला लुटल्याचा आरोप भाजप सातत्याने करतात. मात्र, निवडणूक रोख्यांचा वापर करून भाजपने काही वर्षांतच सात-आठ हजार कोटी जमवले, तर काँग्रेसला आतापर्यंत फक्त आठशे कोटी जमवता आले आहेत. मग देशाला कोणी लुटले भाजप की काँग्रेस ?”

हे वक्तव्य आपण येथे ऐकू शकता.

पुढे उद्धव ठाकरे भाषणात म्हणतात की, भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारी यादीत बेहिशेबी मालमत्ता जमा केली कृपाशंकर सिंह ह्यांचं नाव आहे. परंतु, निष्ठावंत नितीन गडकरी ह्यांचे नाव नाही. तसेच भाजप जाहिरातमध्ये एक महिलाला घर दिल्याचे सांगते. परंतु, त्या महिलेच्या नकळत फोटो काढण्यात आला आणि तिला घर देण्यात आले नाही.

संपूर्ण बातमी येथे वाचू शकता.

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट वाक्य पसरविले जात आहे.

https://www.youtube.com/watch?v=syyr9dR4mAc

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिटडे आहे. उद्धव ठाकरे काँग्रेसला लुटारू म्हटले नाही. ते भाजपवर टीका करत होते. चुकीच्या दाव्यासह एडिटडे व्हिडिओ शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला लुटारू पक्ष म्हटले नाही; चुकीच्या दाव्यासह एडिटेड व्हिडिओ व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate

Result: Misleading