शिवसेना विभक्त होण्यापूर्वीपासून पक्षप्रवेश करताना शिवबंधन (केशरी रंगाचा धागा) बांधण्याची परंपरा आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरे एका मुस्लिम व्यक्तीला हिरवा धागा बांधताना दिसतात.

दावा केला जात आहे की, उबाठा गटात मुस्लिम समुदायाने जास्तीत जास्त प्रवेश घ्यावा यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवबंधनाची चालत आलेली परंपरा मोडून पक्षप्रवेश करणाऱ्याला हिरवा धागा बांधला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेला फोटो बनावट आहे. उद्धव ठाकरे पक्ष प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला केशरी धागा अर्थात शिवबंधन बांधत होते.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये उद्धव ठाकरे एका व्यक्तीला हिरवा धागा बांधत आहे, सोबत अंबादास दानवे दिसतात.

फोटोमध्ये लिहिले आहे की, “आता हिरवे जनाबबंधन बांधून अल्पसंख्यांकांचा प्रवेश! अश्याच लोकांना प्रवेश करता यावा म्हणून उबाठा उरण हत्याकांडावर गप्प आहेत.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल होत असलेला फोटो बनावट आहे.

उद्धव ठाकरे यांनी 30 जुलै रोजी हाच फोटो ट्विटवर शेअर केला होता.

फोटोशेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष हाजी असगर शेख ह्यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले.”

https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1818254168823320579

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ फोटोला एडिट करून केशरी धाग्याला हिरवे करून चुकीच्या दाव्यासह बनावट पसरवला जात आहे

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला फोटो बनावट आहे. मुळ फोटोमध्ये उद्धव ठाकरे पक्ष प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला केशरी धागा अर्थात शिवबंधन बांधत होते. खोट्या दाव्यासह हा बनावट फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पक्ष प्रवेश करणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे हिरवा धागा बांधतानाचा फोटो एडिटेड

Written By: Sagar Rawate

Result: Altered