अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यामध्ये आकर्षक ‘ड्रोन-शो’चे आयोजन करण्यात आले होते, असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा नाही. हा व्हिडिओ एका खाजगी कंपनीने कॉम्प्युटर ग्राफिक्सद्वारे तयार केला आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये आकर्षक पद्धतीने धनुर्धारी श्रीराम आणि सोबत सीता व लक्ष्मण दिसतात. आहे.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “अयोध्येत ड्रोन नी साकारलेले हे सुंदर छायाचित्र.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील ड्रोन-शो’चे दृष्य अयोद्ध्येतील नाहीत.

बॉटलॅब डायनॅमिक्स नामक कंपनीने हा व्हिडिओ तयार केलेला आहे. ही कंपनी ड्रोन-शो सादर करण्याचे काम करते.

व्हायरल व्हिडिओमधील भगवान रामची 3 आकर्षक कलाकृती दाखवण्यात आली आहे. बॉटलॅब डायनॅमिक्स कंपनीने ही कलाकृती वेगवेगळ्या दिवशी शेअर केली होती.

खालील मूळ व्हिडिओमध्ये आपण ते एक-एक दृष्य पाहू शकतो.

दृष्य क्र. 1

भगवान राम बाण मारतानाचे हे दृष्य राम मंदिर उद्धाटनाच्या 3 दिवसांपूर्वी अर्थात 18 जानेवारी रोजी शेअर करण्यात आला होता.

https://www.instagram.com/reel/C2PtaQCBfz_/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

दृष्य क्र. 2

भगवान राम, सीत आणि लक्ष्मण या दृष्यामध्ये दिसतात. हा व्हिडिओ 15 जानेवारी रोजी शेअर करण्यात आला होता.

https://www.instagram.com/reel/C2H_-5AyfYS/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

दृष्य क्र. 3

भगवान राम बाण मारतानाचा हा व्हिडिओ गेल्या महिन्यातला असून 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी निमित्त शेअर करण्यात आला होता.

https://www.instagram.com/reel/Czh-0OryueA/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

बॉटलॅब डायनॅमिक्स

ही कंपनी ड्रोन-शो करण्याचे काम करते. राम मंदिर उद्धाटन आणि राम मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळ्या निमित्त या कंपनीने 22 जानेवारी रोजी एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करताना देखील कंपनीने स्पष्ट सांगितल की, “हा व्हिडिओ खऱ्या ड्रोन-शोचा नसून ही आमच्या टीमने तयार केलेली डिजिटल आवृत्ती आहे.”

राम मंदिर लाईट-शो

आयोध्येमध्ये राम मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळा संपन्न झाल्यानंतर राम मंदिरात एक नेत्रदीपक लेझर-शो आयोजित करण्यात आला होता.

खालील व्हिडिओमध्ये त्याच लेझर-शोचे काही दृष्य पाहू शकतो.

https://youtu.be/E-j-MINMMIM?si=RZJd6wYxT45I8UFX

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा नाही. हा व्हिडिओ ड्रोन-शो सादर करणाऱ्या ‘बॉटलॅब डायनॅमिक्स’ नामक कंपनीने डिजिटली तयार केला आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:डिजिटल पद्धतीने तयार केलेला व्हिडिओ राम मंदिर उद्घाटन सोहळ्यातील ड्रोन-शो म्हणून व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Misleading