मृत्यूच्या ५० वर्षांनंतरही हरभजन सिंह करतोय नोकरी : सत्य पडताळणी

By :  amruta
Update: 2019-02-20 13:28 GMT

कथन

पंजाब रेजिमेंटचे सैनिक हरभजन सिंह मृत्यूच्या ५० वर्षानंतरही सिक्कीम सीमा रेषेवर रक्षण करतात. आज देखील सैनिक हरभजन सिंह हे मृत्यूनंतरही भारतीय सैन्य दलात नोकरी करतात. याबद्दल सोशल मिडीयावरही पोस्ट वायरल होत आहे.

Full View

अर्काइव्ह

या पोस्टला सध्या ६.७ k इतके लाईक असून ७७७ पेक्षा जास्त शेअर आहेत. याबद्दल केलेली सत्य पडताळणी ..

पंजाब रेजिमेंटच्या २३ व्या बटालियनमधील सैनिक हरभजन सिंह यांचा जन्म ३० ऑगस्ट १९४६ साली सध्याच्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या गुज्जरवाला जिल्ह्यात झाला. त्यांच्याबद्दल अधिक विस्तृत माहिती खाली दिलेल्या संकेतस्थळावर पहा.

विकिपीडिया l अर्काइव्ह

सैनिक हरभजन सिंह यांच्याबद्दल विविध हिंदी वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. हिंदीच्या मानाने मराठी वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या बद्दल कमी नोंद आहे.

सैनिक हरभजन सिंह यांच्याबद्द्ल अनेक वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. १९६६ मध्ये पंजाब रेजिमेंटच्या २३ व्या बटालियन मध्ये ते नोकरीत रुजू झाले. परंतु ४ ऑक्टोबर १९६८ रोजी खच्चरांना घेऊन जाणाऱ्या एका समूहासोबत जात असतांना सिक्कीम जवळील नदी पार करतांना त्यांचा पाय घसरून ते नदीत पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर वृत्त वाचू शकता.

अमर उजाला - अर्काइव्ह l नवभारत टाइम्स - अर्काइव्ह l खासरे - अर्काइव्ह

सैनिक हरभजन सिंह यांच्या बद्दल वन इंडियाने एक विडीओ प्रसिद्ध केला आहे.

विडीओ

https://www.youtube.com/watch?v=lZrFEY6tSg8

अर्काइव्ह

वरील विडीओमध्ये २.५१ मिनिटांपासून ते 3.१८ मिनिटांपर्यंत सैनिक हरभजन सिंह हे त्यांच्या मृत्यूनंतरही भारतीय सैन्य दलात नोकरी करत आहेत, तसेच नियमानुसार त्यांची पदोन्नती आणि पगार हे देखील दिला जात आहे. हा सर्व खर्च भारतीय सेना विभागाकडून करण्यात येतो. अशी माहिती देण्यात आली आहे.

तसेच आज तक या वृत्त वाहिनीनेही याबद्दल एक विडीओ प्रसिद्ध केला आहे.

https://youtu.be/QazC4apRuao

अर्काइव्ह

वरील विडीओच्या आधारे सैनिक हरभजन यांच्या मृत्यूनंतरही त्यांना पगार देण्यात आला आहे आणि नियमाप्रमाणे त्यांना रिटायर्ड म्हणजेच निवृत्ती देखील देण्यात आली आहे. याबद्दल आज तकच्या विडीओमध्ये ८.५७ मिनिटांपासून ते ९.१७ मिनिटांपर्यंत त्यांच्या नोकरी आणि पदोन्नती बद्दल माहिती दिली आहे. तसेच सैनिक हरभजन सिंह यांचे नाव आता बाबा हरभजन सिंह असे झाले आहे. तसेच ११.४४ मिनिटांपासून ते १३.०५ मिनिटांपर्यंत बाबा हरभजन सिंह यांच्या नोकरीतील पगार, निवृत्ती आणि निवृत्ती पेन्शन याबद्दल माहिती देण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे बाबा हरभजन हे २००६ मध्ये सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. एका शिपाई या पदावर रुजू होवून, मृत्युनंतरही नियमाप्रमाणे पदोन्नती होत कॅप्टन पदावरून निवृत्त झाले. त्यांची आई जिवंत होती तोपर्यंत त्यांची पेन्शन त्यांच्या आईला मिळत होती.

सीमेवरील बाबा हरभजन सिंह यांच्या बंकर मंदिराची सर्व देखभाल आणि व्यवस्था आता भारतीय सैन्य दलाकडून करण्यात येते.

सीमेवरील बाबा हरभजन सिंह यांचे मंदिर.

निष्कर्ष : मृत्युनंतरही सैनिक हरभजन सिंह यांनी भारतीय सैन्य दलात नोकरी केली, केवळ नोकरीच केली नाही तर नियमाप्रमाणे पदोन्नती आणि भारतीय सैन्य दलातून निवृत्ती देखील घेतली. परंतु आजही अनेक भारतीय सैनिकांच्या मनात बाबा हरभजन सिंह हे सीमेवर इतर सैनिकांप्रमाणे तैनात आहेत असे आहे. त्यामुळे मृत्युनंतरही सैनिक हरभजन सिंह यांनी भारतीय सैन्य दलात नोकरी केली हे खरे आहे.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:मृत्यूच्या ५० वर्षांनंतरही हरभजन सिंग करतोय नोकरी : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale

Result: True

Similar News