भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या रोहिंग्यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले का ? वाचा सत्य

Update: 2024-10-19 13:37 GMT

पोलिस एका ट्रकमधून काही मुलांना बाहेर काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन दावा केला जात आहे की, कोल्हापूर पोलिसांनी भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या रोहिंग्यांना ताब्यात घेतले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील मुल भारतीय असून उन्हाळी सुट्टी संपवून मदरशात परतत होते.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिस एका ट्रकमधून काही मुलांना बाहेर काढताना दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “महाराष्ट्रातील कोल्हापुरात रोहिंग्या मुस्लिमांना घेऊन जाणारा ट्रक पकडला गेला.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे.

लोकमतने 17 मे 2023 रोजी प्रकाशित केलेल्या बातमीनुसार मुस्लीम समाजातील 7 ते 14 वयोगटाची 63 मुलांना घेऊन जाणारा ट्रक कोल्हापूर पोलिसांनी पडकला होता. ही सर्व मुले कोल्हापुरात रेल्वेने दाखल झाली आणि त्यानंतर एका ट्रकमधून ती आजरा येथे जाणार होती. पण हिंदुत्ववादी संघटनानी संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेतले.

पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक महितीनुसार ही सर्व मुले बिहारमधून आली असून कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथल्या एका मदरशात शिक्षणासाठी आली होती.

अधिक सर्च केल्यावर कळाले की, लोकमत आणि आयएएनएस युट्यूब चॅनलवर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचा खुलासा केला की, ही मुले बिहार आणि बंगालमधून आली असून आजरा इथल्या एका मदरसात शिक्षकतात. ही मुले उन्हाळ्याच्या सुट्यानंतर घरुन परत मदरशामध्ये जात होती. मुले लहान असल्या करणाने बाल कल्याण समितीला या बाबत कळवले आहे. तसेच आम्ही मदरशाला संपर्क करुन सर्व विद्यार्थ्यांचे वय, रहिवासी आणि पालकांच्या माहितीचे कागदपत्र मागवले आहेत. कागदपत्रांची पडताळी करुन योग्यती कारवाही केली जाईल.

Full View

फॅक्ट क्रेसेंडोने पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी व्हायरल दाव्याचे खंडन करत सांगितले की, व्हायरल व्हिडिओमधील मुले रोहिंग्या नाहीत. सुरुवातीला आम्हालादेखील वाटले की हे प्रकरण बाल तस्करीचे असावे पण तसे नव्हते. ही मुले पश्चिम बंगाल आणि बिहारचे रहिवासी असून ते आजरा येथील मदरसामध्ये शिक्षण घेत आहेत.

तसेच आम्ही बाल कल्याण समिती (सीडब्यूसी) कोल्हापूरचे मॅजिस्ट्रेट पद्मजा घेर यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, या घटनेत प्रामुख्याने अल्पवयीन मुलांचा सहभाग होता. या मुलांपैकी बहुतांश बिहारमधील अररिया आणि सुपौल भागातील असून ते आजरा येथील मदरसामध्ये शिक्षण घेत आहेत. व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा असून ही मुले रोहिंग्या नाहीत.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील मुले रोहिंग्या नसून ते बिहार आणि बंगालमधून आली होती. ही मुले कोल्हापूरातील मदरसेत शिकत असून ते उन्हाळीत सुट्टी संपवून घरुन मदरसामध्ये परतत होते. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Claim :  महाराष्ट्रातील कोल्हापुरात रोहिंग्या मुस्लिमांना घेऊन जाणारा ट्रक पकडला गेला.
Claimed By :  Social Media User
Fact Check :  MISLEADING
Tags:    

Similar News