राहुल गांधी व काँग्रेसच्या आमदार आदिती सिंग यांच्या लग्नाविषयी अफवा पुन्हा व्हायरल. वाचा सत्य

Update: 2019-11-18 17:58 GMT

राहुल गांधी यांच्या लग्नाची अफवा पुन्हा एकदा सोशल मीडियावर पसरली आहे. रायबरेली येथील काँग्रेसच्या आमदार आदिती सिंह यांच्याशी त्यांचा विवाह होणार असल्याची गेल्या वर्षी अफवा उठली होती. आदिती सिंह यांचे येत्या 21 नोव्हेंबर रोजी लग्न ठरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधीशी त्यांचे नाव जोडले जात आहे.

“राहुल गांधी या सुंदर तरुणी सोबत अडकणार लग्न बंधनात” अशा मथळ्याखाली एक बातमी सोशल मीडियावर फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर या बातमीची लिंक पाठवून तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम सदरील लिंकवरील बातमीला आम्ही भेट दिली. तेव्हा खाली दिलेल्या स्क्रीनशॉटमधील बातमी आढळली. यामध्ये म्हटलंय की, सोशल मीडियावरील एका फोटोमध्ये राहुल गांधी एका तरुणीसोबत दिसत असून, तिचे नाव आदिती सिंह आहे. ती काँग्रेसची आमदार असून, तिच्या राहुल गांधी विवाह बंधनात अडकणार असल्याचे पक्के मानले जात आहे.

मूळ बातमी तुम्ही येथे वाचा – महत्त्वाचेअर्काइव्ह

गुगलवर जेव्हा यासंबंधी शोध घेतला तेव्हा कळाले की, गेल्या वर्षी राहुल गांधी आणि आदिती सिंह यांच्या लग्नाची अफवा पसरली होती. आदिती सिंह रायबरेली येथील काँग्रेसच्या आमदार असून, त्यांचे वडील दिवंगत अखिलेष सिंह हे काँग्रेसचे रायबरेली येथून पाच वेळा आमदार राहिलेले आहेत. आदिती सिंह यांचे कुटुंब सोनिया गांधी यांना भेटल्याचे फोटो सोशल मीडियावर पसरवून तेव्हा राहुल गांधी आणि आदिती यांच्या विवाहाच्या वावड्या उठल्या होत्या.

मूळ बातमी - टाईम्स ऑफ इंडियाआज तक

आदिती सिंह यांनी स्वतः ट्विट करून या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले होते. “राहुल गांधी माझे मोठे बंधू आहेत. आम्हाला बदनाम करण्यासाठी आमच्या विवाहाच्या धदांत खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. त्यामुळे लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. तसेच अशा बातम्या शेयर न करण्याचे मी आवाहन करते.” एबीपी न्यूजनेदेखील गेल्यावर्षी याविषयी बातमी दिली होती. ती तुम्ही खाली पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=o4AYrfLpAUk

मग आता पुन्हा लग्नाच्या अफवा का?

आदिती सिंह यांचे 21 नोव्हेंबर रोजी पंजाबमधील आमदार अंगद सिंग सैनी यांच्याशी लग्न होणार आहे. नवी दिल्ली येथे हा विवाह सोहळा होणार आहे. अंगद हे सहा वेळा नवनशहर येथील आमदार राहिलेले दिलबाग सिंग यांचे पुत्र आहेत. आदिती सिंह यांचे आता लग्न होत असल्यामुळे राहुल गांधी यांच्याशी त्यांचे नाव जुळवण्याचा खोडसाळपणा पुन्हा केला जात आहे.

मूळ बातमी - एनडीटीव्ही

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, राहुल गांधी यांचा आदिती सिंह यांच्या विवाह होणार नाही. ती केवळ अफवा आहे. आदिती सिंह यांचा विवाह पंजाबमधील आमदार अंगद सिंग सैनी यांच्याशी होणार आहे. “महत्त्वाचे” या वेबसाईटवरील बातमीच्या शेवटी केवळ एका ओळीत आदिती आणि सैनी यांच्या लग्नाची माहिती दिली असली तर, बातमीचे शीर्षक वाचकांना चुकीची माहिती देत आहे.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:राहुल गांधी व काँग्रेसच्या आमदार आदिती सिंग यांच्या लग्नाविषयी अफवा पुन्हा व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False Headline

Tags:    

Similar News