Fact Check : या व्हिडिओसोबत पसरविण्यात येणारी माहिती किती सत्य?

Update: 2019-09-28 13:46 GMT

जय महाराष्ट्र दोन दिवसांपूर्वी PMC बँक बंद झाली. परंतु या बँकेमध्ये असणारे फक्त पंजाबी खाते धारकांना बँक मागच्या दरवाजाने आत घेऊन त्याचे पैसे परत देत आहे आणि आपली मराठी व इतर लोकांना/जनतेला फक्त 10000 हजार रु देत आहे. या बँकेच्या संचालक मंडळामध्ये मुलुंडच्या भाजप चा आमदार सरदार तारासिंग व त्यांच्या मुलगा आहे, अशी माहिती संदिप गडदे यांनी 10 लाख राजसाहेब समर्थकांचा ग्रुप जो add होईल त्याने पुढील १० जणांना Add करा पोस्ट केली आहे. या माहितीसोबत एक व्हिडिओही देण्यात आला आहे.

मूळ फेसबुक पोस्ट

तथ्य पडताळणी

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक बंद झाल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही सर्वप्रथम ही बँक बंद झाली आहे का, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या संकेतस्थळावर असलेल्या विविध संपर्क क्रमांकावर आम्ही संपर्क साधला. त्यावेळी बँक बंद झाली नसल्याचे स्पष्ट करत बँकेवर काही र्निबंध लादण्यात आल्याची माहिती आम्हाला देण्यात आली. त्यानंतर बँकेवर काय र्निबंध लादण्यात आलेत याची माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा रिझर्व्ह बँकेने 23 सप्टेंबर 2019 रोजी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेला काय आदेश दिलेत याची मराठी भाषेतील प्रत आम्हाला दिसून आली. हे र्निबंध सहा महिन्यासाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यानंतर बँकेवर र्निबंध असल्याने बँकेची 28 सप्टेंबर 2019 रोजी होणारी सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आल्याचे आणि याची माहिती शेअरहोल्डर्सला कळविणारे एक बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांचे एक पत्र आम्हाला दिसून आले.

रिझर्व्ह बँकेचे मुख्य व्यवस्थापक योगेश दयाल यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे 24 सप्टेंबर 2019 रोजी स्पष्ट केले आहे की, पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे बँकिंग परवाना रद्द करण्यात आलेला नाही. बँक आपला व्यवसाय करु शकते. रिझर्व्ह बँक यात परिस्थितीनुसार बदल करु शकते, असेही या प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

बँक केवळ पंजाबी खातेदारांना मागच्या दरवाजाने पैसे देत असल्याचा आणि मराठी व इतर लोकांना/जनतेला दहा हजार रुपये देण्यात आल्याचा आरोप करतानाच या बँकेच्या संचालक मंडळामध्ये मुलुंडच्या भाजपचा आमदार सरदार तारासिंग व त्यांच्या मुलगा आहे, असे म्हटले आहे. याविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही सध्या बँकेच्या संचालक मंडळावर कोण आहेत, याची माहिती घेतली. त्यावेळी आम्हाला खालील माहिती दिसून आली.

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेची मूळ माहिती / Archive

या माहितीविषयी सत्यता जाणून घेण्यासाठी सरदार तारासिंग यांच्याशीही संपर्क केला. त्यावेळी त्यांनी आपण बँकेच्या विद्यमान संचालक मंडळावर नसल्याचे स्पष्ट केले. बँकेवर आर्थिक निर्बंध असून रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असल्याने अशा प्रकारचा कोणताही भेदभाव होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. नियमाला धरुनच जे काय असेल ते घडत असेल असे मत त्यांनी व्यक्त केले. आपला मुलगा राजनीत हा संचालक मंडळावर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आम्ही राजनीत सिंग यांच्याशी संपर्क केला त्यावेळी त्यांनी बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध कोणत्याही प्रकारचा भेदभाव होत असल्याची शक्यता फेटाळून लावली. दरम्यान काही जणांनी या व्यक्ती बँकेसमोर गर्दी असल्याने आणि त्यांच्या वस्तूंची चोरी होण्याची भिती वाटत असल्याने ते लॉकरमधील आपल्या वस्तू बँकेच्या पाठीमागून नेत असल्याचा दावा केला आहे.

हा व्हिडिओ पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचाच आहे का? तो नेमका कुठला आहे याची पडताळणी करण्यासाठी या व्हिडिओतील काही दृश्ये घेत ती रिव्हर्स सर्च केली. यातून आम्हाला कोणताही अपेक्षित परिणाम मिळाला नाही. काही जणांनी हा प्रकार पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या सांताक्रुझ पश्चिम शाखेत घडल्याचा दावा केला आहे. या ठिकाणी भौगोलिक रचना तशी असल्याचे गुगल मॅप्सच्या सहाय्याने आढळत असले तरी या घटनेची आणि ती पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेची शाखाच असल्याची पुष्टी मात्र होत नाही.

आमच्या संशोधनात पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक बंद झाल्याचा दावा मात्र असत्य आढळून आला आहे. सरदार तारासिंग हे विद्मान संचालक असल्याचा दावाही असत्य आढळला. त्याचा मुलगा राजनीत हा संचालक असल्याचा दावा मात्र सत्य आढळला आहे.

निष्कर्ष

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक बंद झाल्याचा दावा मात्र असत्य आणि सरदार तारासिंग हे विद्यमान संचालक असल्याचा दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळला. त्याचा मुलगा राजनीत हा संचालक असल्याचा दावा मात्र सत्य आढळला आहे. ही पीएमसी बँकेची शाखा व हे व्हिडिओतील व्यक्ती या बँकेचे ग्राहक असल्याचे सिध्द होत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट अर्धसत्य म्हणजेच संमिश्र स्वरुपाची आढळली आहे. 

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:Fact Check : या व्हिडिओसोबत पसरविण्यात येणारी माहिती किती सत्य?

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False

Tags:    

Similar News