लोकसभा प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाली का? दोन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल

Update: 2024-04-03 16:55 GMT

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रचारादरम्यान मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, जनतेने भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रचारादरम्यान मारहाण केली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, 2 वर्षांपूर्वीचा जुना व्हिडिओ चुकीच्या माहितीसह शेअर केला जात आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये गुलाबी झेंडे आणि गमछे घातलेले काही लोक भाजप कार्यकर्त्यांना लाठीने मारहाण करत पळ काढण्यास भाग पाडत आहेत.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, ‘या वेळेस 400 पारच्या आधीच भक्तांना 400 काठ्यांचा प्रसाद.”

Full View

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या वेबसाईटवर या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ 10 फेब्रुवारी 2022 रोजी उपलोड केला होता.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “तेलंगणात मोदीविरोधी आंदोलनादरम्यान भाजप आणि टीआरएस कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष.”

व्हिडिओसोबत दिलेल्या बातमीनुसार “हे दृश्य तेलंगणातील जनगाव येथील असून या ठिकाणी मोदी सरकारच्या विरोधातील आंदोलन करण्यात आले होते.”

आर्काइव्ह

तसेच वन इंडिया न्यूजच्या युट्यूब चॅनलवर आपण हाच शेअर करत महिती दिली की, त्याठिकाणी पाहू शकतो. व्हिडिओ सोबत माहिती देण्यात आली की, टीआरएस पक्षाचे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध दर्शवण्यासाठी त्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करत होते. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर टीआरएस कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर लाठीने हल्ला केला होता.

https://youtu.be/K4IUxIk1SWA?si=hsGsZlPh3d6IgRqz

आर्काइव्ह

या विरोधाचे नेमके कारण काय ?

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देणारे पंतप्रधान मोदी यांनी फेब्रुवारी 2014 मध्ये संसदेत कोणत्याही चर्चेविना आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयक (तेलंगणा कायदा) "घाईघाईने" मंजूर केल्याबाबत केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारला दोष दिला. या आघाडीमेध्ये तेलंगणा राष्ट्रीय समिती (TRS) सध्याची भारत राष्ट्र समितीचा (BRS) सहभाग होते.

नरेंद्र मोदींचा या टिकेचा विरोध करण्यासाठी फेब्रुवारी 2022 मध्ये भारत राष्ट्र समितीने तेलंगणामध्ये भाजप सरकारच्या विरोधातील आंदोलन केले होते.

खालील व्हिडिओमध्ये आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेमध्ये केलेले भाषण पाहू शकता.

https://www.youtube.com/live/jW7ZCj4SwOA?si=O0b0Y1SmuyZSmW9V&t=3677

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून 2 वर्षांपूर्वीचा आहे. तेलंगणातील जानगाव जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात केलेल्या आंदोलनादरम्यान तेलंगणा राष्ट्रीय समिती (TRS) आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली होती. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:लोकसभा प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाली का? दोन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: False

Tags:    

Similar News